Share

“मोदींजींनी खरे शिवभक्त असल्याचे संपूर्ण देशाला दाखवून द्यावे, अन्यथा…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कर्नाटकची राजधानी बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून समाजकंटकांनी गुरुवारी(१६ डिसें.) रात्री महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतल्याने आता राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या घटनेवर केलेल्या असंवेदनशील वक्तव्याचाही तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांनी या घटनेचा निषेध करत संताप व्यक्त केला आहे.

यासंदर्भात रुपाली चाकणकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की, कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळूर येथे संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली याचा करावा तितका निषेध कमीच आहे परंतु यापेक्षा चीड आणणारे, संतापजनक विधान भाजपचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलं आहे. ते म्हणतात ,’शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणे ही अत्यंत क्षुल्लक गोष्ट आहे’ महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करायचं दूरच पण या घटनेविरोधात आंदोलन करणाऱ्या शिवप्रेमी बांधवांविरुद्ध कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत.’

दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की, काशी विश्वनाथ धामच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये पंतप्रधान मोदीजी शिवाजी महाराजांबद्दल गौरवोद्गार काढताना म्हणाले होते की, ‘भारताच्या मातीची खासियतच अशी आहे की इथे जर औरंगजेब आला तर त्याला पुरून उरण्यासाठी शिवाजी महाराजच उभे राहतात.’ मोदीजींनी कर्नाटकच्या या औरंगजेबरुपी मुख्यमंत्र्याला पदावरून खाली खेचून निष्कासित करावे आणि आपण खरे शिवभक्त आहोत हे संपूर्ण देशाला तसेच महाराष्ट्राला दाखवून द्यावे अन्यथा बोलाचीच कढी आणि बोललाच भात ही तुमच्याबाबतीत देशभर बनत असेलली प्रतिमा आणखी घट्ट होईल, असेही त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!