🕒 1 min read
मुंबई : कर्नाटकची राजधानी बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून समाजकंटकांनी गुरुवारी(१६ डिसें.) रात्री महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतल्याने आता राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील(Jayant Patil) यांनी आज (१९ डिसें.)महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जाऊन महाराजांना दुधाचा अभिषेक करतील’, अशी घोषणा केली आहे.’
यासंदर्भात जयंत पाटील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’कर्नाटकात काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या, दिनांक १९ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जाऊन महाराजांना दुधाचा अभिषेक करतील.’ तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. उद्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी अभिवादन करतील, असेही पाटील म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. उद्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी अभिवादन करतील.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) December 18, 2021
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार(AjitPawar), जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या घटनेविषयी निषेध व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …तेथे ‘स्वराज्य खाऊन टाकू नका’ असा फलक लावण्याची देशावर वेळ- संजय राऊत
- “केंद्र सरकारला विरोधकांचे भय सोडाच, पण आदरही नाही”
- “छत्रपतींसमोर नतमस्तक न होणाऱ्या मलिकला कडेवर घेणारे आम्हाला शहाणपण शिकवताय”
- ‘शिवसेनेत गद्दार दुसरं तिसरं कोणी नसून फक्त रामदास कदमच महागद्दार’
- रामदास कदमांच्या टीकेवर अनिल परबांची प्रतिक्रिया, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
