🕒 1 min read
मुंबई : फेब्रुवारी 2022 मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. म्हणजेच निवडणुकीला जवळपास 9 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. पण निवडणुकीच्या आधीपासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या संकटकाळात शिवसेनेने मुंबईत चांगल्याप्रकारे काम केले आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना अपयशी ठरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा शब्दांत महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात चांगले काम केले आहे. या काळात आपल्याला कोणी वाचवलं आणि कोण आपल्याला संकटात घालत आहे, हे मुंबईकर पाहतच आहेत, असे पेडणेकर यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. शिवसेना मुंबईत प्रत्येक स्तरावर काम करत आहे, हीच भाजपची पोटदुखी आहे. त्यामुळे भाजपचे नेते लोकांची दिशाभूल करत आहेत. मात्र, जीवन-मरणाचा प्रश्न होता तेव्हा आपल्यासोबत कोण होते, हे नागरिकांना चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. त्यामुळे विरोधकांना आरोप करत राहू दे, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशात मृतदेह नदीत टाकले जात आहेत. तिकडे मृत्यूचं तांडव सुरु असताना भाजपच्या नेत्यांना निवडणुकीची काळजी लागली आहे, असा टोलाही यावेळी किशोरी पेडणेकर यांनी लगावला.
दरम्यान आज भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला होता. ‘मुंबई महापालिका निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून शिवसेनेची काही खलबतं आणि कटकारस्थानं सुरू आहेत. यावर भाजप लक्ष ठेवून आहे. आपली हार लक्षात घेऊन शिवसेनेने पळवाट काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असं सांगातनाच शिवसेनेने निवडणूक आयोगाच्या आड राजकारण करू नये. दोन वर्ष निवडणुका पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव आहे. शिवसेनेचा हा डाव आम्ही हाणून पाडू,’ असा इशारा शेलार यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- Breaking : पदोन्नती आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक…
- दोन कोटी दोन लाख रुपये खर्च करुन औरंगाबाद मनपा करणार ७ हजार पलंगाची खरेदी
- पंजाब किंग्सचा ‘हा’ शिलेदार अडकला विवाहबंधनात; ट्विट करुन दिली माहिती
- ‘त्यांच्यासाठी आयपीएल थांबवली जाणार नाही’ परदेशी खेळाडूच्या उपस्थीतीवर राजीव शुक्ला यांचे संकेत
- ‘कोरोनाचा बहाणा करुन मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव’

