मुंबई : कोरोना संसर्गामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली. यानंतर स्पर्धेचे उर्वरीत सामने कधी आणि कुठे होणार असे प्रश्न विचारले जाऊ लागले. यादरम्यान २९ मे रोजी बीसीसीआयने एक बैठक बोलावली आणि आयपीएल २०२१ स्पर्धेचे उर्वरीत सामने युएई मध्ये होणार असल्याची घोषणा केली.
आयपीएल २०२१ स्पर्धेच्या उर्वरीत सामन्याची घोषणा झाल्यानंतर आयपीएलमधील सर्व संघानी तयारीला सुरुवात केली. यादरम्यान मात्र पंजाब किंग्स संघाचा एक शिलेदार विवाहबंधनात अडकला आहे. मुळचा वेस्ट इंडिजचा पण आयपीएल मध्ये पंजाब किंग्सकडून खेळणारा निकोलस पुरनने नुकताच विवाह बंधनात अडकला. निकोलस पुरनने त्याची मैत्रीण कॅथरिन मिगुल हिच्याशी विवाह केला आहे. पुरणने लग्नाचा फोटो ट्विट करत ही गोड बातमी चाहत्यांना शेअर केली.
Jesus has blessed me with many things in this life. None greater than having you in my life.
Welcoming Mr. and Mrs. Pooran ❤️ pic.twitter.com/dDzSX8zdSA— NickyP (@nicholas_47) June 1, 2021
या ट्विटमध्ये पुरनने ‘देवाने मला आयुष्यात चांगल्या गोष्टी दिल्या. तुझ्यापेक्षा माझ्या आयुष्यात काहीच श्रेष्ठ नाही. स्वागत करा मीस्टर आणि मीसेस पुरनचे’ असे लिहीले आहे. आयपीएल स्पर्धेत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर पुरन मायदेशी वेस्ट इंडिजला गेला होता. यादरम्यान निकोलस पूरनने कोरोनाच्या संघर्षात भारताला मदत म्हणून आपल्या आयपीएल मानधनातील हिस्सा दान करण्याची घोषणा देखील केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- काल अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन आणि आज लसीकरण केंद्रच बंद ; नागरिकांमध्ये नाराजी
- ‘फडणवीस १ दिवसाच्या जळगाव दौऱ्यावर गेले, आता मुख्यमंत्र्यांनी किमान १ तासासाठी तरी यावं !’
- मुंबईतील लोकल ट्रेन सुरु होणार ? ; महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले स्पष्टीकरण
- काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळला! कॅप्टन अमरिंदर सिंह आणि नवज्योत सिंग सिद्धू आमने-सामने
- ‘इंधन दरवाढ आणि मायनसमधील जीडीपी, हे तर केंद्राने दिलेलं रिटर्न गिफ्ट’; जयंत पाटलांचा भाजपला टोला


