औरंगाबाद : कोविड केअर सेंटरसाठी दोन कोटी रुपये खर्च करून सात हजार पलंग खरेदी केली जाणार आहे. या ठरावाला महापालिका प्रशासकांनी नुकतीच मान्यता दिली असून टप्प्याटप्प्याने ही खरेदी केली जाणार असल्याचे समजते. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे शहरात दिलासादायक वातावरण तयार झाले आहे. अनेक कोविड केअर सेंटर्स तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या या पलंगाची गरज नाही तरीही कोरोनाच्या नावाखाली मनपा प्रशासनाने अशाप्रकारे खरेदीचा सपाटाच लावला आहे.
शहरात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. मात्र फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला होता. त्या वेळी शहरातील कोविड केअर सेंटर रुग्णालय फुल्ल झाली होती. आता पुन्हा तिसर्या लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेने कोविड केअर सेंटरसाठी पलंग खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका प्रशासनाने तसा ठरावही मंजूर केला आहे. राज्य शासनाकडून प्राप्त होणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन निधी लेखा शीर्षातून पलंग खरेदी करण्याचा उल्लेख ठरावात करण्यात आला आहे.
निधी उपलब्ध करण्यासाठी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी. पहिल्या टप्प्यात एक हजार पर्यंत पुरवण्याचे आदेश देण्यात यावेत. असेही ठरावात म्हटले आहे. खरेदीसाठी प्रती पलंग दोन हजार ८९० रुपये असा खर्च येणार आहे. सुरुवातीला पाच हजार पलंग खरेदी करण्यासाठी १ कोटी ४४ लाख ५० हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. आता सुधारित प्रस्तावानुसार पलंग खरेदी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी २ कोटी २ लाख ३० हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात येत आहे असे ठरावात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘त्यांच्यासाठी आयपीएल थांबवली जाणार नाही’ परदेशी खेळाडूच्या उपस्थीतीवर राजीव शुक्ला यांचे संकेत
- ‘कोरोनाचा बहाणा करुन मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव’
- डब्लुटीसीच्या फायनलमध्ये ‘या’ कारणामुळे न्युझीलंड भारतीय संघाला भारी पडु शकतो: दिलीप वेगंसकर
- पापणी लवण्याआधी धोनीप्रमाणे क्षणात त्याने केले यष्टीचित; व्हिडीओ व्हायरल
- काल अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन आणि आज लसीकरण केंद्रच बंद ; नागरिकांमध्ये नाराजी


