Share

‘कोरोनाचा बहाणा करुन मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव’

Published On: 

मुंबई : फेब्रुवारी 2022 मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. म्हणजेच निवडणुकीला जवळपास 9 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. पण निवडणुकीच्या आधीपासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचा कोरोनाचे कारण सांगत मुंबई महानगरपालिका निवडणूक दोन वर्ष पुढे ढकलण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावरून आता भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. महापालिकेच्या निवडणुका दोन वर्षासाठी पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव आहे. शिवसेनेचा हा डाव आम्ही हाणून पाडू, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे. गेल्या दीड वर्षात शिवसेनेने अनेक कट रचले. पहिली कोरोनाची लाट आल्याने मे महिन्यातच मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा त्यांचा डाव होता.

मात्र दुसरी लाट आल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला. त्यानंतर दुसरा डाव टाकला. महापालिकेची प्रभाग रचना भाजपला पूरक असल्याचा आरोप करत ही प्रभाग रचना बदलण्याचाही प्रयत्न झाला. पण तो प्रयत्नही फसला. आता तिसरा प्रयत्न लपूनछपून करण्यात येत आहे. कोरोनाच्या नावाखाली अनेक गोष्टी केल्या जात आहेत. जनगणना करता येत नाही. नवी मतदार नोंदणी करताना अधिक वेळ लागेल. त्यामुळे महापालिकेला दोन वर्षे मुदत वाढ देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.

मुंबई महापालिका निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून शिवसेनेची काही खलबतं आणि कटकारस्थानं सुरू आहेत. यावर भाजप लक्ष ठेवून आहे. आपली हार लक्षात घेऊन शिवसेनेने पळवाट काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असं सांगातनाच शिवसेनेने निवडणूक आयोगाच्या आड राजकारण करू नये. दोन वर्ष निवडणुका पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव आहे. शिवसेनेचा हा डाव आम्ही हाणून पाडू, असा इशारा शेलार यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!