Share

‘त्यांच्यासाठी आयपीएल थांबवली जाणार नाही’ परदेशी खेळाडूच्या उपस्थीतीवर राजीव शुक्ला यांचे संकेत

Published On: 

मुंबई : कोरोना संसर्गामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली. यानंतर स्पर्धेचे उर्वरीत सामने कधी आणि कुठे होणार असे प्रश्न विचारले जाऊ लागले. यादरम्यान २९ मे रोजी बीसीसीआयने एक बैठक बोलावली आणि आयपीएल २०२१ स्पर्धेचे उर्वरीत सामने युएई मध्ये होणार असल्याची घोषणा केली.

आगामी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएल २०२१ स्पर्धेचे उर्वरीत सामने युएई मध्ये आयोजीत करण्यात येणार आहे. या काळात इंग्लंड संघाचे अंतरराष्ट्रीय वेळापत्रक व्यस्त असल्यामुळे इंग्लंडचे खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकत नाही. यानंतर बांग्लादेशच्या खेळडुच्या समावेशाबद्दलही साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेत परदेशी खेळाडूंचा समावेश कमी असण्याची शक्यता आहे. यावर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आपले मत मांडले आहे. ‘जर स्पर्धेत परदेशी खेळाडू उपलब्ध नसतील तर त्यांच्यासाठी स्पर्धा थांबवण्यात येणार नाही.’ असे राजीव शुक्ला म्हणाले.

यावेळी बोलताना स्पर्धा खेळवणे हा आमचा मुख्य उद्देश्य आहे. जो परदेशी खेळाडू उपलब्ध आहे तो ठीक आहे फ्रेंचाईजी, उपलब्ध असतील ते नवीन खेळाडू आपल्या संघात समाविष्ट करू शकतात. आम्ही त्यांच्यासोबत ही स्पर्धा पूर्ण करू. असे म्हणाले. आयपीएल २०२१ स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने २९ सामन्यांनंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!