औरंगाबाद : लॉकडाऊन, त्यानंतर करण्यात आलेले रस्त्याचे काम यामुळे दीड वर्षांपासून गुलमंडीतील रस्ता बंद असल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत. त्रस्त व्यापारी वर्गाने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरेंनी आत्तापर्यंत दोनदा घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. मात्र शिवसेनेच्या शब्दाला ही आता प्रशासनात वजन नसल्याचे दिसून येत आहे. कारण दलाल वाडी नाल्याचे काम हनुमानाच्या शेपटी सारखेच लांबत चालल्याचे दिसून येत आहे.
गुलमंडीतील औषधी भवन जवळील नाल्याचे काम जलदगतीने करा. नागरिकांना व व्यापाऱ्यांना न्याय देण्याच्या सूचना शिवसेना नेते खैरे यांची प्रशासनाला यापूर्वीच दिल्या होत्या. गत महिन्यात चंद्रकांत खैरे यांनी या ठिकाणी पाहणी केली होती. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी या ठिकाणी ते पाहणीसाठी आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. गुलमंडी दलालवाडी पुलाचे काम सुरू आहे. या कामांची शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आज पाहणी केली. या औषधी भवन नाल्याचे काम जलदगतीने करा. अशा सूचना पुन्हा एकदा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची प्रशासनासह ठेकेदाराला दिल्या आहेत.
मात्र याचा किती फायदा होतो हे येणाऱ्या काळातच कळेल. शहरातील मुख्य बाजारपेठ व रहदारीचा भाग म्हणून नागरिकांची नेहमी वर्दळ असते. रस्ता बंद असल्याने अनेक अपघात वाढले असून ट्राफिक जॅम होत असल्याने वादविवाद होत आहेत. यामुळे हे काम लवकर व्हावे, असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी संबंधित ठेकेदार व मनपा आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी उपभियंता जे. बी. गाडेकर, माजी नगरसेवक सचिन खैरे आदींसह व्यापारी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात माझाच बळी जातोय’, प्रताप सरनाईकांची खंत
- ‘औरंगाबादच्या दीक्षा शिंदेंची नासात निवड ही अफवा!’, खा.जलील यांचे ट्विट
- ‘भारताने अद्यापही तालिबानवर बंदी का घातली नाही?’, ओवेसींचा मोदींना सवाल
- महाविकास आघाडीचा निर्णय! आशा स्वयंसेविकांना हजार रुपये, गटप्रवर्तकांना १२०० रुपये वाढ
- महाविकास आघाडीतील तीन पक्ष आता शेवटची तडफड करतायत – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
