औरंगाबाद: सोयगाव नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळविले. हा विजय विश्वासाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा असल्याचे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी सोयगाव येथे विजयोत्सव साजरा करताना व्यक्त केले. सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने याठिकाणी मोठी मारली बाजी मारली असून भाजपचा याठिकाणी सुपडा साफ झाला आहे.
सोयगाव मध्ये महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाचा विजय झाला असून या निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी ११ जागेवर विजय मिळवत शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. भाजपला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले. सोयगावला लवकरच वाढीव पाणीपुरवठा योजना मिळवून देणार असून सोयगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा बसविण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले.
सोयगाव शहरातील अंतर्गत रस्त्यांचा विकास साधून सोयगावला विकासाच्या माध्यमातून नवे रूप देणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. औरंगाबाद जिल्ह्यात सोयगाव नगर पंचायतीची एकमेव निवडणूक होती. भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सोयगाव येथील निवडणुकीत जोरदार प्रयत्न करून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र मतदार बांधवांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता शिवसेनेला स्पष्ट बहुमत दिले. शिवसेनेच्या सहा उमेदवारांचा केवळ २-३ मतांच्या फरकाने पराभव झाला. या निवडणुकीत भाजपला जोरदार चपराक बसली. असेही सत्तार यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
बदनापूर नगरपंचायतीत भाजपने ‘असा’ दिला महाविकास आघाडीला शह; नगराध्यक्षाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?
देवगड नगरपंचायत निवडणूकीत नितेश राणेंना मोठा धक्का; भाजपने गमावली सत्ता!
“हे आर आर आबांचं रक्त!”, अजित पवारांचा रोहित पाटलांवर कौतुकाचा वर्षाव; सुप्रिया सुळे भावूक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

