🕒 1 min read
दिल्ली: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी धक्कादायक खुलासा केला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी सचिन वाझेला पुन्हा कामावर घेतले होतं, असा खुलासा त्यांनी ईडीला २ फेब्रुवारीला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये केला होता. ईडीने त्यांना सचिन वाझेला पुन्हा कामावर घेण्याचे कारण विचारले होते, त्याला उत्तर म्हणून त्यांनी हे वक्तव्य केले होते.
पण त्याला प्रतिउत्तर म्हणून राऊत म्हणाले आहेत की, परमबीर सिंग (parambir singh) हे स्वत: एक आरोपी आहेत. त्यांच्यावर खंडणी, अपहरण असे अनेक गुन्हे आहेत. कदाचित मनसुख हिरेन (mansukh hiren case) प्रकरणात त्यांच्यावर कोणते आरोप लावले आहेत, हे त्यांना माहीत नाही. पण आरोपी आपल्या बचावासाठी अशी नावे घेत असतो. आतापर्यंत असे अनेक प्रकार झाले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाने कितीही आरोप केले आणि त्याचं भांडवल करण्याचा प्रयत्न केला, तरी त्याचा उपयोग होणार नाही, त्यांनी आरोप करत राहावं.
आरोपी स्वत:ला वाचवण्यासाठी कुणाचेही नाव घेत असतो. आम्हीही अनेकदा पंतप्रधानांचे नाव घेत असतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचेही नाव घेतलं जात होतं, यातून काहीही सिद्ध होत नाही, असे संजय राऊत म्हणाले. ते दिल्लीत बोलत होते. यावेळी त्यांच्या निकटवर्तीयांची ईडीकडून होणाऱ्या चौकशीबद्दल प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, या सरकारमध्ये कारवाया होत असतात, आम्ही त्या कारवाया सहन करत असतो, 2024 पर्यंत या कारवाया आम्ही सहन करू. यावेळी त्यांनी राहुल गांधीच्या संसदेतील भाषणाचेही कौतुक केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
