🕒 1 min read
लंडन: इंग्लंड संघाच्या सततच्या खराब कामगिरीमुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे मॅनेजिंग डायरेक्टर ‘एश्ले जाइल्स’ यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. अॅशेस मालिकेपाठोपाठ इंग्लंडचा वेस्ट इंडिजविरुद्ध सुद्धा लाजिरवाणा पराभव झाला होता. इंग्लंडच्या क्रिकेट संघाच्या मागचे शुक्लकाष्ट संपता संपेना.
इंग्लंडच्या पुरुष क्रिकेट संघाची २०२१ मधील कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. २०२१ वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या अॅशेस मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर , इंग्लंड संघाचा वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत ३-२ असा पराभव झाला. वेस्टइंडीज संघ हा तुलनेनं दुबळा संघ असून सुद्धा इंग्लंड संघाचा पराभव झाल्याने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे मॅनेजिंग डायरेक्टर ‘एश्ले जाइल्स’ यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
इंग्लंड मधील काही वृत्तपत्रांनुसार जाइल्स यांना बोर्डाकडून पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचे कळते आहे. इंग्लंडकडून ५४ कसोटी आणि ६२ वनडे खेळणारे जाइल्स इंग्लंड बोर्डाचे डायरेक्टर म्हणून गेल्या ३ वर्षापासून काम पाहत आले होते. इंग्लंडचे ते एक यशस्वी डावखुरे गोलंदाज होते. जाइल्स यांच्याच कार्यकाळात इंग्लंडने २०१९चा वनडे विश्वकरंडक पहिल्यांदा उंचावला होता. एश्ले जाइल्स यांच्या राजीनाम्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार एड्यू स्ट्रॉस यांच्याकडे अंतरिम कार्यभार सोपवण्यात आला आहे. राजीनामा दिल्यावर एश्ले जाइल्स यांनी इंग्लंड संघाला आगामी क्रिकेट साठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
महत्वाच्या बातम्या :
- “बचावासाठी आरोपी इतरांची नावं घेत असतो..”; परमवीर सिंहाच्या खुलाशाला राऊतांचे प्रतिउत्तर
- “मच्छीमार, रिक्षावाले, बलुतेदारांचा विचार नाही… टेंडर आणि बिल्डर मात्र जोरात”, मुंबई अर्थसंकल्पावरून आशिष शेलारांची टीका
- घरकुल योजनेवरुन औरंगाबादेत भाजप आक्रमक; महाविकास आघाडीवर केला योजना अयशस्वी केल्याचा आरोप!
- “यश विराट सारखाच दबावात चांगला खेळतो”; यशाच्या कोचची भविष्यवाणी ठरली खरी
- “व्वारे व्वा नवाब साहेब, हर्बल गांजा वाले आपली नशा…”, सदाभाऊंचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
