🕒 1 min read
मुंबई: मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) निवडणूक (Election)जवळ आली असताना आज पालिकेचा अर्थसंकल्प (Budget) सादर झाला आहे. गेल्या वर्षी ३९ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मात्र भाजप नेते आशिष शेलार (BJP leader Ashish Shelar) यांनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त करत मच्छीमार, रिक्षावाले, बलुतेदारांचा विचार नाही… टेंडर आणि बिल्डर मात्र जोरात अशी टीका केली आहे.
५०० चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता कर माफ केला तसा मुळ मुंबईकर असलेल्या कोळीवाडे आणि गावठाणातील नागरिकांना काही देण्याची नियत दिसली नाही. कोविडमुळे अडचणीत आलेल्या मच्छीमार, रिक्षावाले, बलुतेदारांचा संवेदनशीलपणे विचार केला असेही नाही… टेंडर आणि बिल्डर मात्र जोरात! असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
500 चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता कर माफ केला तसा मुळ मुंबईकर असलेल्या कोळीवाडे आणि गावठाणातील नागरिकांना काही देण्याची नियत दिसली नाही. कोविडमुळे अडचणीत आलेल्या मच्छीमार, रिक्षावाले, बलुतेदारांचा संवेदनशीलपणे विचार केला असेही नाही… टेंडर आणि बिल्डर मात्र जोरात!
3/4— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 3, 2022
11000 कोटीची बिल्डरांना केलेली प्रीमियम सवलतीची खैरात.. आणि मालमत्ता कराचे उत्पन्न कमी झाले…कोविड मुळे अर्थचक्राला आलेल्या मर्यादेमुळे उत्पन्नात घट झाली असे सांगितले जात असले तरी अर्थसंकल्पात 17.7% वाढ होऊन 45,949 कोटींनी कसा फुगला?
आकडे तरी खरे, की तिथेही लपवाछपवी?
4/4— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 3, 2022
तसेच ११००० कोटीची बिल्डरांना केलेली प्रीमियम सवलतीची खैरात.. आणि मालमत्ता कराचे उत्पन्न कमी झाले. कोविड मुळे अर्थचक्राला आलेल्या मर्यादेमुळे उत्पन्नात घट झाली असे सांगितले जात असले तरी अर्थसंकल्पात १७.७% वाढ होऊन ४५,९४९ कोटींनी कसा फुगला? आकडे तरी खरे, की तिथेही लपवाछपवी? असा सवालही आशिष शेलार यांनी केला आहे.
मेट्रो, कोस्टल रोड, गारगाई धरणासारखे महत्त्वकांक्षी प्रकल्प मुंबईकरांसाठी आणणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कधी आभार मानले नाहीत, पण दरवर्षी मुंबईची तुंबई करणाऱ्या “कारभार्यांचा” आयुक्तांनी न चुकता जयजयकार केला.
हा अर्थसंकल्प होता की अभिनंदनाचा ठराव? असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- घरकुल योजनेवरुन औरंगाबादेत भाजप आक्रमक; महाविकास आघाडीवर केला योजना अयशस्वी केल्याचा आरोप!
- “यश विराट सारखाच दबावात चांगला खेळतो”; यशाच्या कोचची भविष्यवाणी ठरली खरी
- “व्वारे व्वा नवाब साहेब, हर्बल गांजा वाले आपली नशा…”, सदाभाऊंचा खोचक टोला
- टीईटी घोटाळा प्रकरणात भारतीय प्रशासकीय अधिकारी सुशील खोडवेकरच्या अडचणीत वाढ
- अभिनयातील देव हरपला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
