मुंबई : येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत आमच्या तिसऱ्या उमेदवाराचा विजय होणारच, असा ठाम विश्वास भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी शिवसेनेच्या संजयचा पराभव होणारचं, असंही म्हंटले आहे. राज्यसभा निवडणुकीच्या नियोजनासाठी भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबत आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीनंतर ते पत्रकार परीषेदेत बोलत होते.
शेलार म्हणाले, “आज आमचे केंद्रीय निरिक्षक आणि रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्या उपस्थितीत दोन बैठका झाल्या आहेत. सोबतच केंद्रीय मंत्री आणि आमचे राज्यसभेचे उमेदवार पीयूष गोयलही उपस्थित होते. यावेळी झूम बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी देखील मार्गदर्शन केले आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. या निवडणुकीचं जोरदार पूर्वनियोजन आम्ही केलं असून, आमचा तिसरा उमेदवार जिंकणारचं आणि शिवसेनेच्या संजयचा पराभव होणारच हे स्पष्ट आहे”
शिवसेनेला समोर पराभव दिसत आहे – शेलार
शिवसेनेला समोर पराभव दिसत असल्यानं त्याचं चिंतन करण्याआधीच ते उत्तरे पेरत आहेत. केंद्रीय यंत्रणांचा याच्याशी काही एक संबंध नाही. ज्यांच्या पक्षीय यंत्रणा बिघडल्या आहेत. ज्यांचं पक्षीय स्वास्थ्य बिघडलं आहे ते फुकटचे वारे आपल्या तोंडातून घालवत आहेत, अशी सवय असलेल्यांमध्ये संजय राऊत पुढे आहेत, असा टोलाही शेलार यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :


