Share

“लोकं स्वत:शीच लग्न करायला लागली तर हिंदूंची संख्या कमी होईल”; भाजपा आमदाराचा ‘सोलोगॅमी’ला विरोध

Published On: 

गुजरात : गुजरातमधील वडोदरा येथील २४ वर्षीय क्षमा बिंदू नावाच्या तरुणीने सांगितले आहे की, ती या महिन्यात स्वत:शीच लग्न करणार आहे. स्वतःशीच लग्न म्हणजे, स्वत:वर प्रेम करण्याचा संदेश देण्याचं एक प्रतिक असेल, असंही तिने सांगितलं. यावर समाजामध्ये विविध संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्यानंतर आता वडोदराच्या माजी उपमहापौर आणि भाजपा नेत्या सुनीता शुक्ला यांनीही यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. हिंदू धर्म व हिंदुत्व सोलोगॅमी ची परवानगी देत नाही, असे शुक्ला म्हणाल्या. या अशा प्रकारामुळे हिंदूंची लोकसंख्या कमी होईल, असंही त्या म्हणाल्या.

क्षमा बिंदू या २४ वर्षीय तरुणीने ११ जून रोजी वडोदरा येथील हरिहरेश्वर मंदिरात स्वतःशी लग्न करणार असल्याचे जाहीर केल होते. याला विरोध करताना सुनीता शुक्ला यांनी हे सिंगल मॅरेज कॅनेडियन वेब सिरीज ‘एनी विथ ई’ वरून प्रेरित असल्याचं म्हटलं आहे. शुक्ला म्हणाल्या की, एकपत्नीक विवाह हिंदू धर्माच्या विरोधात आहे. याचे फार विपरीत परिणाम समाजावर घडून येईल. त्यामुळे हिंदूंची लोकसंख्या कमी होईल. मंदिरात असे लग्न होणे, याला माझा विरोध आहे. तिला कोणत्याही मंदिरात लग्न करू दिले जाणार नाही.

महाराष्ट्र काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी एकल लग्न किंवा स्व-विवाह हा निव्वळ वेडेपणा असल्याचं म्हटलं होतं. देवरा म्हणाले, “आशा आहे की हा वेडेपणा भारतापासून दूर राहील.” त्यांच्या या वक्तव्यावर समाज माध्यमांवर विविध तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यानंतर आता भाजपाच्या सुनीता शुक्ला ट्विट करून म्हणाल्या, “मी मंदिरातील एकल विवाहाविरोधात आहे. तिला कोणत्याही मंदिरात लग्न करू दिले जाणार नाही. असे विवाह हिंदू धर्माच्या विरोधात आहेत. त्यामुळे हिंदूंची लोकसंख्या कमी होईल.”

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!