नाशिक : राज्यसभा निवडणुकीवरून सध्या राज्यातील राजकीय नेत्यांमध्ये काटशहाचं राजकारण पाहायला मिळत आहे. अशातच घोडेबाजार हा शब्दही चर्चेत आला आहे. राज्यसभेची सहावी जागा निवडून आणण्यासाठी भाजपकडे किमान आवश्यक मते नसल्याने त्यांच्याकडून घोडेबाजार केला जाण्याची शक्यता आहे, असा आरोप संजय राऊत आणि शिवसेनेकडून करण्यात येत आहे. आता यावर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर टीकेचा बाण सोडलं आहे.
‘जर राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होत असल्याचा आरोप असेल तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून माहिती घेऊन पोलिसांनी बाजार मांडणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. या प्रकरणात मुख्यमंत्री आणि सामनाच्या संपादकांचे स्टेटमेंट घेऊन कारवाई करावी. आमदारांना घोडे म्हणण्याचं काम गाढवच करू शकतो,’ असा खोचक टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.
सध्या राज्यभरातच कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. राज्य सरकारच्या बरोबरच केंद्र सरकारनेही कांदा प्रश्नात लक्ष घालावं, अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली होती. सोमय्या यांना कांदा भेट देत आंदोलन करणाऱ्या या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर त्यांना सोडण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

