मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ही हिंदी चित्रपटसृष्टीतील वरिष्ठ अभिनेत्रींनपैकी एक आहे. माधुरीने इ.स. १९८० च्या दशकाची शेवटची काही वर्षे आणि इ.स. १९९० च्या दशकात हिंदी चित्रपटांतील एक नावाजलेली अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून आपले स्थान पक्के केले आहे. नुकतेच माधुरीने एका मराठी कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती.
माधुरी दीक्षित मराठी चित्रपटात फारसे काम केले नाही. मात्र ती एक मराठी मुलगी असल्याने अनेकांना तिच्या बाबत एक विशेष अभिमान आणि कौतुक आहे. नुकताच माधुरी राजश्री मराठीच्या एका मराठी कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. यामध्ये तिने एक खुलासा केला आहे.
https://www.instagram.com/p/CTOyk9_tILE/?utm_source=ig_web_copy_link
या कार्यक्रमादरम्यान ती प्रचंड आनंदी असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी तिनं सांगितलं, की ती मराठी कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे, हे ऐकून तिची आई खूप खुश झाली होती. हे ऐकल्यानंतर तेथील अनेकांना तिचे कौतुक वाटले आणि आपल्या भाषेवर आजही तितकेच प्रेम करत असल्याचे जाणवले. तर यावेळी माधुरीने एक खास उखाणा देखील होता.
बॉलिवूडची ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यासाठी आणि सुंदर हास्यासाठी ओळखली जाते. तसेच माधुरीच्या आभिनयासह तिच्या सौंदर्यावर देखील अनेकजण घायाळ आहेत. माधुरी आजही इतर नवीन अभिनेत्रींना लाजवेल असे काम करते तसेच तिचे सौंदर्यापुढे अनेक अभिनेत्री फिक्या पडतात.
महत्त्वाच्या बातम्या
- सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू समर्थपणे मांडण्यात राज्य सरकार सपशेल नाकाम ठरले – काकडे
- दरड कोसळली: औट्रम घाटात मदतकार्य सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
- ‘अण्णा हजारे इतके दिवस कुठे होते?’, मंदिराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा सवाल
- ‘नाक्यावर संजय राऊत सारखे माणसे पैसे देऊन विकत घेता येतात’, नितेश राणेंचा टोला
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

