Share

कोरोनाचा पुन्हा शिरकाव ; पुणे जिल्ह्यातील हॉटस्पॉट गावांची संख्या शंभरी पार

Published On: 

पुणे : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत होती त्यामुळे आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत असल्याचे मागील काही दिवसांपूर्वी आपल्याला पाहायला मिळाले होते.

परंतु आता राज्यावर आणि देहावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट उभे राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्व आरोग्य यंत्रणा त्यादृष्टीने सज्ज होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान आता पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढल्याचं दिसत आहे. गेले दोन आठवडे आटोक्यात असलेल्या कोरोनाने या आठवड्यात पु्न्हा डोकं वर काढलं आहे. गेल्या आठवड्यात कमी झालेल्या हॉटस्पॉट गावांची संख्या पुन्हा वाढली आहे.

पुणे जिल्ह्यातल्या गेल्या आठवड्यात 95 गावं हॉटस्पॉट होती, त्यांची संख्या आता पुन्हा वाढून 103 वर गेली आहे. सध्या पुणे ग्रामीणमध्ये 3.6 टक्के बाधित दर आहे. गेले दोन आठवडे पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत होती. त्यामुळे हॉटस्पॉट गावांची संख्या 95 वर आली होती.

पण या आठवड्यात कोरोनाचा दर जरी आटोक्यात असला तरी रुग्णसंख्या वाढल्याने हॉटस्पॉट गावांची संख्या वाढली आहे. या आठवड्यात हॉटस्पट या हॉटस्पॉट गावांमध्ये दहापेक्षा जास्त कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. काही औद्योगिक वसाहती असलेल्या भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याचं आव्हान आरोग्य विभागापुढे आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने हॉटस्पॉट गावांसह सर्वच ठिकाणी धडक चाचण्यांची मोहीम हाती घेतली होती. या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!