Share

‘ठाण्यात फेरीवाल्याने केले ते दुर्दैवी, राज्य सरकार कडक कारवाई करणार’, राज्यसभा खा.संजय राऊतांची ग्वाही

Published On: 

मुंबई : सोमवारी(३० ऑगस्ट)सायंकाळी ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा विभागाच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंवळे ह्या कासारवडवली भागातील मार्केट परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या असता तेथील फेरीवाल्याने पिंवळे यांच्यावर चाकूहल्ला केला. या हल्ल्यात त्यांची दोन बोटे तुटली. यावेळी त्यांना वाचविण्यासाठी आलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट कापले गेले . दरम्यान, या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून यासंदर्भात शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यासंदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया देत राऊत म्हणाले की,’ठाण्यात फेरीवाल्याने जे केले ते दुर्दैवी आहे, त्यावर कडक कारवाई राज्य सरकार करत आहे. तसेच सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला आहे’ असेही राऊत म्हणाले.

दरम्यान, हल्ला करणाऱ्या फेरीवाला अमरजीत यादव याला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी पिंपळे यांचं पथक घोडबंदरच्या कासारवडवली येथील मुख्य मार्केटमध्ये पदपथ आणि रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेले होते. सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही कारवाई सुरू होती. त्याच वेळेस अमरजीत याने कारवाई करण्यासाठी पथक पुढे येत पिंपळे यांच्यावर चाकूहल्ला केला. त्याने त्यांच्या डोक्यावर चाकू भिरकवला असता बचाव करण्यासाठी पिंपळे यांनी डोक्यावर हात ठेवला, त्यात त्यांच्या डाव्या हाताची दोन बोटे तुटून खाली पडली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!