🕒 1 min read
मुंबई:- केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे. या आंदोलनाला राज्यातून पाठींबा देण्यात येत असून शिवसेनेने देखील वेळोवेळी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत कृषी कायद्याविरोधात आक्रमक भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल दिल्ली सीमेवर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून गाझीपूर बॉर्डर येथे त्यांनी शेतकरी नेत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकरी नेत्यांसोबत गळाभेट घेतलेले फोटो चांगलेच व्हायलर झाले आहेत. तर, संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडून शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी उचललेल्या पावलाचा निषेध देखील केला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या या दौऱ्यावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी अत्यंत जळजळीत टीका केली आहे. कृषी कायदाला शिवसेनेने लोकसभेत विरोध केला होता. तर राज्यसभेत या कायद्याच्या विरोधात मतदान करण्यासाठी पळून गेले होते. मुंबईमध्ये शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी सुरुवातीला सकारात्मकता दाखविली. नंतर ऐनवेळी या आंदोलनापासून शिवसेना दूर राहिली. त्यांचे नेते काल दिल्लीत आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेले. हे त्यांचे ढोंग आहे, अशी टीका निरुपम यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- एलआयसीच्या खासगीकरणामध्ये पॉलिसीधारकांना मिळणार मालक होण्याची संधी !
- माजी आ.हर्षवर्धन जाधव यांच्या मैत्रिणीचा विनयभंग, गुन्हा दाखल
- एल्गार परिषदेत गरळ ओकणारा शरजील उस्मानी नक्की आहे तरी कोण ?
- भाजपच्या मतपेढीला सुरुंग लावण्याचे शिवसेनेचे प्रयत्न सुरूच; ‘उद्धव ठाकरे आपडा’नंतर ‘रासगरबा’
- धोनीच्या शेतातील भाजी विकणारी गोंडस भाजीवाली झीवा ! पहा व्हिडीओ…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
