Share

Shivsena । “तिन्ही कृषी कायदे मागे घेतलायनानंतर मोदी सरकारने शेतकरी हिताचे…”; शिवसेनेचा थेट केंद्रसरकारला सवाल

Published On: 

Shivsena । मुंबई : गेल्या वर्षी देशात लागू करण्यात आलेले तीन कृषि कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते, पण तरी ते आम्ही त्यांना समजवू शकलो नाही, ही आमचीच चूक आहे, असं मोदी म्हणाले. मात्र त्यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारविरोधात आंदोलने केली होती. या आंदोलनात दिल्लीच्या सीमेवर ३० पेक्षा जास्त शेतकऱ्‍यांचा बळी गेला होता. कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याचं म्हणत शेतकऱी संघटना दोन महिने दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत होते. यानंतर आता याच विषयावर शिवसेना मुखपत्र सामानातून केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आला आहे.

काय म्हंटल आहे आजच्या अग्रलेखात ?

मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेतले, पण त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते त्यादृष्टीने काहीच हालचाल केलेली नाही. कृषी सुधारणांबाबत जी समिती सर्वोच्च न्यायालयाच्याच सूचनेनुसार स्थापन केली गेली, तिची साधी बैठक घेण्याचा मुहूर्तही केंद्र सरकारला गेल्या आठ महिन्यांत सापडलेला नाही. मंत्रीपुत्राने चार शेतकऱ्यांना चिरडून मारल्याने गेल्या वर्षी ‘लखिमपूर खिरी’ गाजले होते. आज त्याच ठिकाणी भारतीय किसान मोर्चाने तीन दिवसांची ‘महापंचायत’ बोलावली आहे. गेल्या वर्षी दिल्लीच्या सीमांवर झालेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाची धग अद्याप कायम आहे असाच त्याचा अर्थ आणि इशारा आहे. केंद्रातील सत्ताधारी तो समजून घेणार आहेत का?

केंद्र सरकारने तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर दीड टक्का व्याज अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सरकारने 2022-23 आणि 2024-25 या कालावधीसाठी 38 हजार 856 कोटी रुपयांची तरतूदही केल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना काळात ही योजना बंद करण्यात आली होती. मात्र आता ती सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राला पुरेसा कर्जपुरवठा होईल, असा दावा केंद्र सरकार करीत आहे. सरकारचा हा दावा वगैरे ठीक असला तरी कृषी कायदे रद्द करताना मोदी सरकारने आंदोलक शेतकऱ्यांना जो ‘वादा’ केला होता, तो आजपर्यंत पाळलेला नाही त्याचे काय? त्याचे उत्तर सरकारकडे आहे का? किंबहुना ते नसल्यानेच काही वरवरचे निर्णय घेऊन शेतकरीहिताचे ढोल सरकार पिटत असते.

शेतकऱ्यांच्या हितासाठी तिन्ही कृषी कायदे मागे घेतले असा आव आणणाऱ्या मोदी सरकारने नंतर शेतकरी हिताचे कोणते निर्णय घेतले हा संशोधनाचा विषय ठरावा. कृषी कर्जावर व्याज अनुदान, शेतकऱ्याच्या बँक खात्यात वर्षाकाठी सहा-सात हजार रुपये जमा करणे, काही कृषी मालाचे किमान हमी दर वाढविणे असे काही निर्णय सरकारच्या ‘रुटीन कारभारा’चाच भाग आहेत. कृषी कायदे आणि ऐतिहासिक शेतकरी आंदोलन यांच्या माघारीनंतर ठोस असे काहीच केंद्र सरकारकडून घडलेले नाही. त्यामुळेच केंद्र सरकार विरुद्ध शेतकरी यांच्या संघर्षाची ठिणगी पुन्हा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वाखाली संयुक्त किसान मोर्चाने लखिमपूर खिरी येथे आयोजित केली आहे.

जिल्हे, राज्यांमध्ये आंदोलनाची फेरी पार पडल्यावर 2 ऑक्टोबर रोजी दिल्लीत विशाल निदर्शने करण्यात येणार आहेत. थोडक्यात, शेतकरी आंदोलनाचा बिगुलच पुन्हा फुंकला जाण्याची शक्यता आहे. मोदी सरकारने तिन्ही कृषी कायदे प्रतिष्ठेचे केले होते. पाशवी बहुमताच्या जोरावर संसदेत ते मंजूर करून घेण्यात आले होते. मात्र नंतर दिल्लीच्या सीमांवर झालेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाच्या आणि जनमताच्या रेटय़ामुळे सरकारला तिन्ही कृषी कायदे मागे घेणे भाग पडले होते. तब्बल 378 दिवस हे आंदोलन सुरू होते. ते दडपण्याचे, त्यात फूट पाडण्याचे सरकारचे सगळे प्रयत्न शेतकरी एकजुटीपुढे फोल ठरले होते. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची रसद तोडण्यापासून त्यांना चिरडून मारण्यापर्यंत मजल गेली होती.

या आंदोलनाला ‘खलिस्तान’चा रंग देण्याचाही प्रयत्न झाला. आंदोलकांना ‘देशद्रोही’ ठरविले गेले. तरीही आंदोलक शेतकऱ्यांचे मनोधैर्य कमी झाले नाही आणि अखेर तिन्ही कृषी कायदे केंद्र सरकारला रद्द करावे लागले. अर्थात केंद्र सरकारसाठी हा ‘नाईलाजाने घ्यावा लागलेला निर्णय’ होता. त्यामुळे कायदे मागे घेतले म्हणजे मोदी सरकारच्या कृषी धोरणात ‘यू टर्न’ होईल असे समजण्याचे कारण नाही, असे इशारे तज्ञ मंडळींनी तेव्हाच दिले होते. ते इशारे गेल्या वर्षभरात खरेच ठरले आहेत. कारण मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेतले, पण त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते त्यादृष्टीने काहीच हालचाल केलेली नाही. कृषी सुधारणांबाबत जी समिती सर्वोच्च न्यायालयाच्याच सूचनेनुसार स्थापन केली गेली तिची साधी बैठक घेण्याचा मुहूर्तही केंद्र सरकारला गेल्या आठ महिन्यांत सापडलेला नाही.

पुन्हा आंदोलनकर्त्या किसान मोर्चाने या समितीत सहभागी होण्यास नकार दिल्याने निर्माण झालेला तिढा सोडविण्यातही सरकारने रस दाखविलेला नाही. लखिमपूर खिरीमध्ये केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशीष याने त्याच्या गाडीखाली चार शेतकऱ्यांना चिरडून मारले होते. त्यावरून अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी झाली. मात्र त्या मागणीलाही केंद्र सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. आता म्हणे सर्वोच्च न्यायालयामुळे नेमलेल्या समितीची पहिली बैठक घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. म्हणजे त्यादेखील हालचालीच आहेत. पुन्हा आंदोलक शेतकऱ्यांना आजवर ना भरपाई मिळाली आहे ना त्यांच्यावरील राजकीय गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन सरकारने पूर्ण केले आहे.

केंद्रातील मोदी सरकार अधूनमधून शेतकरी हिताच्या पिपाण्या वाजवते खरे, पण तिन्ही कृषी कायदे मागे घेताना शेतकरी आंदोलकांना दिलेली आश्वासने आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश याबाबत सगळा आनंदीआनंदच आहे. कृषी कायदे जसे सरकारचे ‘प्रतिष्ठे’चे बनले होते, अशी त्यांची ‘वापसी’ सरकारने प्रतिष्ठsची बनवू नये आणि बळीराजाची अवहेलना करू नये. मंत्रीपुत्राने चार शेतकऱ्यांना चिरडून मारल्याने ‘लखिमपूर खिरी’ गाजले होते. आज त्याच ठिकाणी भारतीय किसान मोर्चाने तीन दिवसांची ‘महापंचायत’ बोलावली आहे. गेल्या वर्षी दिल्लीच्या सीमांवर झालेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाची धग अद्याप कायम आहे असाच त्याचा अर्थ आणि इशारा आहे. केंद्रातील सत्ताधारी तो समजून घेणार आहेत का?

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!