मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. नुकतीच पेरणी केलेली बियाणं आणि काढलेला आलेले काही पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली मदत ही पुरेशी नसल्याचे विरोधकांचं म्हणणं आहे. तर यावरूनच आमदार बच्चू कडू यांनी शिंदे फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला आहे.
“अतिवृष्टी झालेल्या भागात आवण मदत म्हणून ५ हजार रुपये देतो. एखाद्या घरात ५-६ माणसं राहता असतात. अतिवृष्टीत त्यांचं घर पडत, खायला अन्नधान्य नसत. अरे ५ हजारात काय होणार आहे? आवास योजनेत घर कोणाला द्यायचं हे जर तुम्हाला ७० वर्षात समजलं नाही तर मुख्यमंत्री, पंतप्रधान काय कामाचे? काँग्रेसच्या वेळेसही तेच झालं, भाजपच्या वेळेसही तेच झालं आणि शिवसेनेच्या वेळीही तेच झालं. आम्हीही तुम्हाला पाठिंबा दिला त्यामुळे आम्हीही तसेच.. आम्ही तरी कुठे चांगले आहोत? आपण जखमेवर मीठ टाकणाऱ्यांची औलाद आहोत. पण याला काय अर्थ आहे? मी शेतकऱ्याच्या बाजूने बोलू कि नको? मला म्हित आहे मी बोलल्यावर तुम्हाला राग येईल. पण मला पर्वा नाही त्याची. चुलीत घाला ते मंत्रिपद. झेंडा घेऊन थोडी निवडून आलोय मी. माझी स्वतःची पानटपरी आहे. पण माझा प्रश्न असा आहे कि या सध्या गोष्टीही तुम्ही कधी बदलणार नाही का?”, असा प्रश बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले कि, “एवढं सगळं झालं तरी आम्ही बोलू नाही शकत कारण आम्हाला मंत्रिपद पाहिजे. पण या मंत्रिपदासाठी मत देणाऱ्या जनतेला विसरायचं का? कुणाचीही सत्ता अली तरीही धोरणं हीच राहणार असतील तर शेतकऱ्याचं खूप नुकसान होईल. हे बदललं पाहिजे.” तसेच कडूंनी त्यांना भाषण करायला वेळ दिल्याबद्दल सभापतींचे आभारही मानले.
महत्वाच्या बातम्या:
- Ajit Pawar | कधी आपल्याला पुन्हा एकत्र यावं लागेल सांगता येत नाही; अजित पवारांचा शिंदे गटाला टोला
- Devendra Fadnavis | अफवांवर विश्वास ठेवू नका; देवेंद्र फडणवीसांनी दिले संशयास्पद बोटीचे तपशील
- Breaking News | संशयास्पद बोटीत AK-47 आणि गोळ्यांचे बॉक्स; चौकशीसाठी स्पेशल पथक नेमण्याची तटकरेंची मागणी
- Breaking News | हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट; बोटीत AK-47 आणि गोळ्यांचे बॉक्स
- Nitish Kumar | “आमचे नाते खूप जुने…”: लालू यादव यांच्या भेटीनंतर नितीश कुमार यांचं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

