Share

Assembly Session 2022 | “एवढे चमचे असताना तुम्ही…”; छगन भुजबळांचा खोचक टोला

Published On: 

मुंबई : राज्यात कालपासून पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षातील नेते चांगलेच आक्रमक झाले. त्यानंतर सभागृहात प्रश्न उत्तरं सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अन्नधान्यावर लावण्यात आलेल्या जीएसटीचा मुद्दा उपस्थित केला. सरकारने कोण कोणत्या गोष्टींवर जीएसटी लावला आहे, याची यादीच त्यांनी वाचून दाखवली.

जीएसटी परिषदेने सुचविलेल्या दरवाढीला देशभरात विरोध होत आहे. ही तांत्रिक दरवाढ आहे असे उत्तर सरकारकडून दिले जात असले, तरी आता दरवाढ करणे टाळता आले असते. राज्यातील आणि देशातील जनतेला या महागाईला तोंड द्यायची वेळ आली नसती. छोट्या छोट्या गोष्टींवर जीएसटी लावणे हे अन्यायकारक असून किमान अन्नधान्य, शालेय साहित्य व हॉस्पिटल बिलावर तरी जीएसटी लावण्यात येऊ नये. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असेल तर टॅक्सेस वाढविण्याचे कारणच काय? सगळ्याच गोष्टींवर जीएसटी लावण्यात येत आहे. आता फक्त भाषणांवर जीएसटी लावायचा बाकी आहे. यापुढे त्यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या भावना आणि महागाईमुळे वाढलेल्या समस्या केंद्र सरकारपर्यंत पोहचवण्याची मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे केली. असेही भुजबळ यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!