मुंबई : पश्चिम बंगाल मध्ये येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप मध्ये दररोज राजकीय वातावरण तापत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे पश्चिम बंगालचं राजकारण ढवळून निघालं आहे. रोड शो, सभा, लंच डिप्लोमसी आणि छोट्यामोठ्या नेत्यांचा पक्षप्रवेश आदी मार्गांनी भाजपने बंगालमध्ये कमळ उमलावे यासाठी रणनीती आखली आहे.
अशातच, बिहार निवडणुकांनंतर शिवसेना पश्चिम बंगालमध्ये देखील निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, पश्चिम बंगालच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा पश्चिम बंगालचा दौरा करू शकतात. शिवसेना कोलकाता, हुगळी, दमदमसह अनेक भागांत आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकते. तसेच निवडणूक लढण्याचा अंतिम निर्णय 29 जानेवारीला पक्षाच्या बैठकीत होणार आहे.
हे वृत्त वाऱ्याच्या वेगाने पसरलं. यासंदर्भात माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न केला असता त्यांनी शिवसेनेला मिश्किल टोला लगावला आहे. ‘शिवसेना पश्चिम बंगालमध्ये लढणार ही आनंदाची गोष्ट आहे. कारण शिवसेनेनं एक रेकॉर्ड बिहारमध्ये तयार केलं आहे. नोटापेक्षा कमी मतं मिळवण्याचा बिहारमधील रेकॉर्ड आप (आम आदमी पक्ष) कडे होता. हा रेकॉर्ड शिवसेनेनं मोडला आहे. आता बंगालमध्ये ह्यापेक्षा मोठा रेकॉर्ड शिवसेना तयार करेल,’ अशी उपरोधिक टीका फडणवीसांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘छत्रपती संभाजी महाराजांचं नाव विमानतळाला देण्यासाठी केंद्र सरकारने अजून मंजुरी का दिली नाही?’
- औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यासाठी ठाकरेंचं केंद्राला पत्र
- हिटमॅन रोहित शर्माच्या आगमनाने ऑस्ट्रेलियन बॉलर्सना धडकी !
- बिल्डर्सना मोठा दिलासा, प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव कॅबिनेटने केला मंजूर
- ‘राज्य सरकारच्या भूमिकेमुळे मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांमध्ये तणाव आणि संशयाचं वातावरण’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
