मुंबई : आज मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीचे ८ निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे. काँग्रेसने याआधी विरोध केलेल्या बांधकाम क्षेत्राशी निगडित प्रस्ताव देखील आज मंजूर करण्यात आला आहे. बांधकाम विकासकांना प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
यामुळं बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोना काळात बांधकाम क्षेत्राला मोठा फटका सहन करावा लागला होता. अनेक बांधकाम व्यावसायिक टाळेबंदीमुळे अडचणीत आले होते. दरम्यान, याआधीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयत्यावेळी प्रस्ताव आल्याने काँग्रेसने विरोध केला होता. आज तीनही पक्षांनी चर्चा करून या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.
कोणतेही बांधकाम करताना वेगवेगळ्या पद्धतीने बांधकाम व्यावसायिकांना सूट दिली जाते. ही सूट दिली म्हणून त्यांना प्रीमियम चार्ज केलं जातं. हा एक वेगळ्या पद्धतीचा टॅक्स असतो. बांधकाम व्यावसायिकांना लिफ्टसाठी, गच्चीसाठी, मैदानासाठी अशा वेगवेगळ्या गोष्टीसाठी सूट देतात. महापालिकेची कमाई प्रीमियम मधून होते. आजच्या निर्णयामुळे महापालिकेला मात्र फटका बसणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच मालमत्ता खरेदीवरील मुद्रांक शुल्कात 31 मार्च 2021 पर्यंत सवलत देण्यात आली होती. 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्कात 1.5 टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे त्याचा हजारो मालमत्ता खरेदीदारांना फायदा होणार आहे. यामुळे बांधकाम क्षेत्रास चालना मिळेल अशी अपेक्षा केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘छत्रपती संभाजी महाराजांचं नाव विमानतळाला देण्यासाठी केंद्र सरकारने अजून मंजुरी का दिली नाही?’
- औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यासाठी ठाकरेंचं केंद्राला पत्र
- हिटमॅन रोहित शर्माच्या आगमनाने ऑस्ट्रेलियन बॉलर्सना धडकी !
- मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना मोफत पाणी द्या; काँग्रेसची मागणी
- ‘राज्य सरकारच्या भूमिकेमुळे मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांमध्ये तणाव आणि संशयाचं वातावरण’


