मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) प्रचार करण्यासाठी गोव्यात पोहोचले असून याच पार्श्वभूमीवर काल(१२ फेब्रु.)आदित्य ठाकरे यांनी पणजीमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली. दरम्यान, आदित्य यांच्या टीकेवर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच शिवसेनेने प्रत्येकवेळी भाजपला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला, असेही फडणवीस म्हणाले.
यासंदर्भात एका मुलाखतीत बोलत असतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,‘शिवसेना राम जन्मभूमीच्या आंदोलनानंतर उत्तर प्रदेशमध्ये २०० जागा लढले होते. परंतु एकाही जागेवर ते डिपॉझिट वाचवू शकले नाहीत. उलट मित्रपक्ष असूनही भाजपला जिथे जिथे नुकसान पोहोचवता येईल तो प्रत्येक वेळी प्रयत्न शिवसेनेने केला. पण ते कधीही यशस्वी झाले नाहीत’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, आदित्य यांना इतिहास माहिती नसून यापूर्वी भाजप सोबत असताना पूर्ण ताकदीनिशी शिवसेना गोव्यात उतरली होती. परंतु गोव्याने प्रत्येक वेळी शिवसेनेला नाकारले. अशी कोणती निवडणूक आहे जिथे भाजप लढतंय म्हणून ते लढले नाहीत?, असा सवालही फडणवीसांनी केला. तसेच मागील २०-२५ वर्ष हे लोक लढत आहेत. परंतु त्यांचे डिपॉझिट कधीच वाचत नाही. इतिहास विसरून हे लोक बोलतात, असेही फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- “इतिहास विसरून हे लोक बोलतात आणि…”, फडणवीसांचा हल्लाबोल
- IPL auction 2022 : जयंत यादव आणि विजय शंकर खेळणार गुजरातकडून
- IPL auction 2022 : मनदीप सिंगसाठी दिल्लीने मारली बाजी
- IPL AUCTION 2022: आता रहाणे बनवणार नाईट रायडर्सना ‘अजिंक्य’
- आदित्य ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले,‘कुणी कुणाच्या पाठीत खंजीर…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

