Share

शिवसेना फोडणार कोरोनाची दहीहंडी; सॅनेटाईझर, मास्क, लसींच्या थरातून कोरोनाविषयक जनजागृती!

Published On: 

औरंगाबाद : जन्माष्टमी होताच दुसऱ्या दिवशी शहरात गोपाळकाला महोत्सवाची धूम असते. गोविंदा आला रे आला…म्हणत सर्व गोविंदा पथक मोठ्या उत्साहात दहीहंडी महोत्सवात सहभागी होऊन सलामी देतात. दहीहंडी फोडतात. परंतु मागील वर्षी पासून दहीहंडी महोत्सवावर कोरोनाचे सावट पसरले आहे. यंदाही कोरोनाचे सावट कायम असल्याने दहीहंडी महोत्सव रद्द करण्यात आला आहे. मात्र यावर्षी सॅनेटाईझर, हँड वॉश तसेच कोरोनाच्या लसींची दहीहंडी सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. शिवसेना शहर प्रमुख यांच्या संकल्पनेतून काही मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत सायंकाळी कोरोना दहीहंडी फोडण्यात येणार आहे.

गर्दी झाली तर कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे सुरक्षितता म्हणून यंदाही दहीहंडी महोत्सव होणार नाही. सर्वांनी सुरक्षितता बाळगावी, नियमांचे पालन करावे असे आवाहन युगधंर दहीहंडी महोत्सवाचे अध्यक्ष आ.संजय शिरसाठ यांनी सांगितले. तसेच कुलस्वामिनी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विलास कोरडे, अलका कोरडे यांच्या नेतृत्वाखाली गोपाळकाला महोत्सवाच्या निमित्ताने सिडको, कुलस्वामिनी मंगलकार्यालय परिसरात खिचडी वाटप करून अन्नदानाचे महत्व कायम ठेवण्यात येणार आहे. याशिवाय अनेक दहीहंडी महोत्सव आयोजकांच्या वतीने गरजूंना मदत करून दहीहंडी महोत्सव यावर्षी साजरा केला जाणार आहे.

गोपाळकाला निमित्ताने दरवर्षी धर्मरक्षक दहीहंडी महोत्सव समितीच्या वतीने दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करत असते. यंदा कोरोना असल्याने औपचारिक पध्दतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टीव्ही सेंटर येथे ५० फुट कोरोनाची दहीहंडी तयार करून ती सायंकाळी फोडण्यात येणार आहे. त्यात सॅनेटाइजर, मास्क, हँडवॉश, तसेच लसीकरण पहिला आणि दुसरा डोस असे थर लावून इंजेक्शनद्वारे दहीहंडी फोडण्यात येणार असल्याचे धर्मरक्षक दहीहंडी महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. या कार्यक्रमात बाळासाहेब औताडे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे,  आ. अंबादास दानवे आदींच्या उपस्थितीत दहीहंडी फोडणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!