Share

‘बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर अजूनही..’, मनसेनी साधला सेनेवर निशाना

Published On: 

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद दरम्यान एक मोठे विधान केले आहे. यावेळी त्यांनी राज्यात कसला लॉकडाऊन आहे? कुठं आहे लॉकडाऊन? सर्व काही व्यवस्थित सुरू आहे. बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर येणाऱ्या बिल्डरांच्या गाड्या कमी झालेल्या दिसत नाहीत. त्यामुळे फक्त लोकांच्या मनात कोरोनाच्या नावाने भीती घालायचे काम सुरु असल्याचे म्हणत त्यांनी सेनेवर निशाना साधला आहे.

दरम्यान मुंबई ठाणेसह बऱ्याच ठिकाणी शासनाचे नियम झुगारून लावत मनसेने दहीहंडी फोडली आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यादरम्यान त्यांनी हे विधान केले आहे. तसेच राज्यात जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. सेनेचे मेळावे सुरु आहेत. तेव्हा कोरोना नाही होत का, असा सवाल करत त्यांनी सर्व काही सूडबुद्धीने केले जात असल्याचा आरोप लगावला आहे.

तसेच यावेळी त्यांनी राज्यातील मंदिरे उघडलीच पाहिजे,अन्यथा राज्यभर मनसे घंटानाद आंदोलन करणार असल्याचा इशारादेखील राज ठाकरे यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!