Share

आपले चिरंजीव यात्रा काढतात तेव्हा ती महाराष्ट्र घडवायला असते मात्र इतरांनी काढली की त्रास सुरू होतो का ?

Published On: 

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यावरील केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आणि शिवसेना आमने-सामने आले होते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मिशन ऑक्सिजन अंतर्गत ठाणे शहरासाठी कायम्वरूपी ऑक्सिजन प्लांटचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ठाकरेंनी अप्रत्यक्षरीत्या भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर टीका केली आहे.

यासंदर्भात बोलत असतांना ते म्हणाले की,’जनता जगली काय?, त्यांचे प्राण गेले काय? आम्हाला १०० टक्के राजकारण करायचे आहे. समोर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असला तरी सुद्धा आम्हाला यात्रा काढायच्या आहेत. आम्हाला नवी सोई सुविधा जनतेसाठी करायच्या नाहीत. पण त्यांचे जीव कदाचित धोक्यात येऊ शकतील, असे सभा समारंभ करायचे आहेत. का तर, आम्हाला जनतेचे आशीर्वाद पाहीजे आहेत. कशाला आशीर्वाद?, जनतेचे जीव धोक्यात घालायला. या सर्व घाणरड्या राजकारणापासून बाजूला राहून आपण सगळेजण जनतेच्या हिताची कामं करत आहोत. तुमचे कौतुक करतो.’ असे म्हणत ठाकरेंनी भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर निशाणा साधला.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पलटवार करत मुख्यमंत्री महोदय आपले चिरंजीव यात्रा काढतात तेव्हा ती महाराष्ट्र घडवायला असते मात्र इतरांनी काढली की त्रास सुरू होतो का ? असा सवाल उपस्थित त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!