🕒 1 min read
मुंबई : केंद्र सरकारने नुकतेच इंधनाच्या दरांमध्ये कपात केली होती. पेट्रोलवर जवळपास ९ रुपये तर डिझेलवर ७.५० रुपये इतकी दरकपात करण्यात आली होती. यानंतर महाराष्ट्र सकारकडूनही इंधनाच्या दारांमध्ये कपात करण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले होते. राज्य सरकारकडून पेट्रोलवर २.८ रुपये तर डिझेलवर १.४४ रुपये दरकपात करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. पण आता या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर ट्वीट करत टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकार लोकांना मूर्ख बनवत असल्याचे फडणवीसांनी म्हंटले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारने राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे. इंधनाची मूळ किंमत, विक्रेत्यांना दिले जाणारे कमिशन, रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस तसेच अॅग्रीकल्चर अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेस अशा सर्व बाबींवर राज्य सरकार करआकारणी करते. त्यामुळे यापैकी कोणत्याही घटकातील कर केंद्राने कमी केला तर राज्याचा कर आपोआप कमी होतो.”
इंधनाची मूळ किंमत,विक्रेत्यांना दिले जाणारे कमिशन,रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस तसेच अॅग्रीकल्चर अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेस अशा सर्व बाबींवर राज्य सरकार करआकारणी करते. त्यामुळे यापैकी कोणत्याही घटकातील कर केंद्राने कमी केला तर राज्याचा कर आपोआप कमी होतो.#PetrolDiesel
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 23, 2022
“महाविकास आघाडी सरकारने लोकांना मुर्ख न बनविता तत्काळ पेट्रोल-डिझेल दरकपातीचा निर्णय घ्यावा, ही माझी पुन्हा मागणी आहे.
कालची घोषणा पाहून ‘उंटाच्या तोंडात जिरे’ असे मी म्हटले होते. पण, प्रत्यक्षात तर हा संपूर्ण प्रकार मे महिन्यात ‘एप्रिल फूल’ करणारा ठरला. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोलवर 2.08 रुपये आणि डिझेलवर 1.44 रुपये जे कमी झाले, तो रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस केंद्र सरकारने कमी केल्याने राज्याचा कर कमी झाला आहे. स्वत: काहीच करायचे नाही आणि केंद्राने घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचे सुद्धा श्रेय घ्यायचे, हे फारच गंभीर आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
