🕒 1 min read
मुंबई: मुंबईच्या बाबतीत सध्या दिल्लीचा विचार बरा नाही. मुंबईचे महत्त्व कमी करण्याची एकही संधी सध्या दिल्लीकर सोडत नाहीत. शिवसेना या सगळ्यांविरुद्ध सर्वच पातळ्यांवर आवाज उठवीत राहिली. कारण हाच आवाज महाराष्ट्राचा आहे व राहील! मुख्यमंत्री शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना या सगळ्या विषयांवर भूमिका घ्यावी लागेल. ते दिल्लीस निघाले आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडावी इतकेच. असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून म्हटले आहे.
महाराष्ट्राचे तीन तुकडे करून तीन वेगळी राज्ये निर्माण करण्याचा विचार दिल्लीच्या मनात आहे व त्याची लवकरच अंमलबजावणी होईल, असे कर्नाटकातील भाजपचे मंत्री जाहीरपणे बोलतात. त्यावर ना मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ना नागपूरकर उपमुख्यमंत्र्याची स्पष्ट भूमिका! महाराष्ट्र तोडण्याच्या केंद्रीय योजनेस या दोघांचा छुपा पाठिंबा तर नाही ना? या शंकेला वाव मिळत आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच पंतप्रधान मोदी यांनी शिंदे यांचे अभिनंदन केले. आता मुख्यमंत्री स्वतः दिल्लीस निघाले. 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून हे राज्य ‘मराठी माणसाने मिळवले. आजचे सरकार आले तसे हे राज्य हवेतून पडले नाही. मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यासाठी मराठी माणसांना रस्त्यावर मोठा संघर्ष करावा लागला. त्यामुळे हुतात्म्यांना फक्त पुष्पचक्र वाहून औपचारिकता पूर्ण केल्याचे समाधान नको, मुंबईविरोधात दिल्लीचे कारस्थान कसे उधळून लावणार, यावर ठोस काय ते सांगा. असे सामनात म्हटले आहे.
शिवसेना एकमेव ‘महाराष्ट्रीय’ बाण्याचा पक्ष आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचे तो जगभर प्रतिनिधित्व करतो, त्यासाठी प्राणांची बाजी लावतो याची पोटदुखी ज्यांना होती त्यांनीच शिवसेना फोडून आनंदाची विकृत ढेकर दिली. शिवसेना संपू नये, अशी भावना महाराष्ट्रातील प्रत्येकाची आहे असे छगन भुजबळ म्हणाले. प्रादेशिक अस्मितेस कायमचे खतम करण्याचे डावपेच देशभरात सुरू आहेत. राजकारणात, राज्यात व देशात फक्त आम्हीच राहू, आम्ही सांगू तेच हिंदुत्व, तोच राष्ट्रीय बाणा याच वातावरणाचे हेलकावे सर्वत्र बसत आहेत. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतून गुजरातला नेले व त्याचे समर्थन फडणवीस करतात. मुख्यमंत्री शिंदे हे स्वतःस शिवसैनिक समजतात. फडणवीसांच्या भूमिकेस त्यांचा पाठिंबा आहे काय? मुंबईतील अनेक केंद्र सरकारी कार्यालये इतर राज्यांत हलवली. एअर इंडियाचे मुख्यालयही नेले, असे बरेच काही पडद्यामागे घडते आहे. शिवसेना या सगळ्यांविरुद्ध सर्वच पातळ्यांवर आवाज उठवीत राहिली. कारण हाच आवाज महाराष्ट्राचा आहे व राहील! मुख्यमंत्री शिंदे यांना या सगळ्या विषयांवर भूमिका घ्यावी लागेल. असे संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Narayan Rane : “उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना पुन्हा उभी…”, नारायण राणेंची जहरी टीका
- Shiv Sena : मुख्यमंत्री निघाले दिल्लीला! “भाजपच्या ‘हो’ला ‘हो’ केले तर…”, शिवसेनेचा इशारा
- BJP vs Shivsena : महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंना बसवलं, आता उपराष्ट्रपती पदावर माजी शिवसैनिकाला बसवण्याची शक्यता
- Girish Mahajan: ‘पवारांना माहिती होतं उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले की…’, गिरीश महाजनांचा शरद पवारांवर आरोप
- IND vs ENG : विराट-राहुल नहीं तो क्या गम! भारतीय संघात युवा खेळाडूंचा जलवा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
