🕒 1 min read
मुंबई: मुंबईच्या बाबतीत सध्या दिल्लीचा विचार बरा नाही. मुंबईचे महत्त्व कमी करण्याची एकही संधी सध्या दिल्लीकर सोडत नाहीत. शिवसेना या सगळ्यांविरुद्ध सर्वच पातळ्यांवर आवाज उठवीत राहिली. कारण हाच आवाज महाराष्ट्राचा आहे व राहील! मुख्यमंत्री शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना या सगळ्या विषयांवर भूमिका घ्यावी लागेल. ते दिल्लीस निघाले आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडावी इतकेच. त्यांच्या गटास मंत्रीपदे वाढवून मिळावीत यासाठीच हा दिल्ली दौरा असेल तर काहीच बोलायचे नाही. भाजपच्या ‘हो’ला ‘हो’ केलेत तर मुंबई हातची जाईलच, महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे मनसुबे भाजप तडीस नेईल. तेव्हा शिंदे गट काय करणार? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून केला आहे.
मुख्यमंत्री शिंदे हे उपमुख्यमंत्री फडणवीसांसह पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीस गेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेणे व आपल्या राज्याच्या प्रश्नांबाबत चर्चा करणे हा राजशिष्टाचाराचा एक भाग आहे. भाजपविरोधी पक्षांची सरकारे येतात व त्या राज्यांचे मुख्यमंत्रीदेखील पंतप्रधानांना भेटायला जातात, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांचे पंतप्रधान कार्यालयात व दिल्लीतील भाजप वर्तुळात विशेष स्वागत होऊ शकते. शिवसेनेत फूट पाडून व मराठी माणसांची ऐक्याची वज्रमूठ फोडून शिंदे हे दिल्लीस जात आहेत. शिंदे व त्यांच्या लोकांनी जे केले, त्यामुळे मुंबईवरील मराठी माणसांचा पगडा कमी होईल व दिल्लीला नेमके तेच हवे आहे.
शिंदे हे फडणवीस यांच्यासोबत पंतप्रधानसाहेबांना भेटतील. नव्हे, त्यांनी भेटायलाच हवे. जाताना त्यांनी महाराष्ट्रहिताचा कोणता कार्यक्रम पंतप्रधानांच्या समोर ठेवण्यासाठी नेला ते स्पष्ट केले पाहिजे. इकडे महाराष्ट्रात शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे समजताच तिकडे बेळगावसह संपूर्ण सीमा भागात मराठी जनांत आक्रोश सुरू झाला. कारण कर्नाटकच्या सरकारने सीमा भागात मराठी बांधवांवर नव्याने दमनचक्र सुरू केल्याचे वृत्त आले आहे. मुख्यमंत्र्यांनी बेळगाव-सीमा भागातील मराठी बांधवांवरील अत्याचारांचा विषय पंतप्रधानांसमोर जोरकसपणे मांडायलाच हवा. बेळगावसह सीमा भाग तत्काळ केंद्रशासित करा, ही आपली मागणी त्यांनी पंतप्रधानांसमोर लावून धरली पाहिजे. आधीच्या मंत्रिमंडळात शिंदे यांच्याकडे सीमा भागाची विशेष जबाबदारी होती. शिंदे यांनी बेळगाव व सीमा भागात जाऊन तेथील मराठी बांधवांवरील अन्यायाचे परिमार्जन करावे अशी अपेक्षा होती. आता ते मुख्यमंत्री झाले व तेही भाजपच्या पाठिंब्याने. त्यामुळे कर्नाटकातील भाजप सरकार शिंदे यांचा शब्द खाली पडू देणार नाही याबाबत आमच्या मनात तरी शंका नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- BJP vs Shivsena : महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंना बसवलं, आता उपराष्ट्रपती पदावर माजी शिवसैनिकाला बसवण्याची शक्यता
- Girish Mahajan: ‘पवारांना माहिती होतं उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले की…’, गिरीश महाजनांचा शरद पवारांवर आरोप
- IND vs ENG : विराट-राहुल नहीं तो क्या गम! भारतीय संघात युवा खेळाडूंचा जलवा
- IND vs ENG : इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेत अर्शदीप सिंग घालू शकतो धुमाकूळ; वाचा!
- Chhagan Bhujbal : दीपक केसरकरांच्या भूमिकेवर छगन भुजबळांनी व्यक्त केलं समाधान, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
