Share

Narayan Rane : “उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना पुन्हा उभी…”, नारायण राणेंची जहरी टीका

Published On: 

मुंबई: शिवसेनेशी दगा करत एकनाथ शिंदे यांनी शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रात स्थापन केले आहे. यानंतर शिवसेनेचे अस्तित्व संपले असल्याची टीका भाजपकडून सतत केली जात आहे. त्यातच भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखालील शिवसेना पुन्हा उभी राहणार नसल्याची जहरी टीका केली आहे. ते सिंधुदुर्ग येथे पत्रकारांशी बोलत होते. तसेच यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांच्या अटक वॉरंटबद्दल विचारले असता नारायण राणे यांनी म्हटले कि, “संजय राऊत यांनी काही तरी गुन्हा केला असणार म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तसेच संजय राऊत हे काही धुतल्या तांदळासारखे नाहीत.” अशी टीका  नारायण राणे यांनी केली आहे.

तसेच शिवसेनेची सत्ता गेली असून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आता गप्प बसून आराम करावा. असा खोचक सल्लाही राणे यांनी दिला आहे. शिवसेनेच्या या अवस्थेला फक्त उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र जबादार असल्याचेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!