🕒 1 min read
मुंबई: ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून सध्या राजकारणातही चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे. यावरच आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीर फाईल्सचे सर्वात मोठे प्रचारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावरच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काश्मीर फाइल्स चित्रपटाचे प्रचारक असून भाजपवाले राजकीय अजेंडा राबवत आहेत, हे संजय राऊत यांचे विधान म्हणजे शिवसेना हिरवी होत असल्याचे निदर्शक आहे. ही शिवसेना शिवसेनाप्रमुखांची नसून सोनिया मॅडम आणि जाणते पवार यांच्या रिमोटवर चालणारी शिवसेना आहे.”, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काश्मीर फाइल्स चित्रपटाचे प्रचारक असून भाजपवाले राजकीय अजेंडा राबवत आहेत, हे संजय राऊत यांचे विधान म्हणजे शिवसेना हिरवी होत असल्याचे निदर्शक आहे.
ही शिवसेना शिवसेनाप्रमुखांची नसून सोनिया मॅडम आणि जाणते पवार यांच्या रिमोटवर चालणारी शिवसेना आहे. pic.twitter.com/y7sInFesYR
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 16, 2022
काय म्हणाले होते संजय राऊत?
“काश्मीर फाईलमध्ये अनेक सत्यं दडवली आहेत. ताश्कंद फाईल्स चित्रपटात लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे खापर एका कुटुंबावर फोडण्याचा अजेंडा होता तसाच अजेंडा काश्मीर फाईल्सचा आहे. महाराष्ट्र सरकारने युती सरकारच्या काळात काश्मिरी मुलांसाठी वैद्यकीय आणि इंजिनिअरिंगमध्ये पाच टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या. काश्मीरची खरी फाईल बाळासाहेब ठाकरे यांना माहिती आहे. नुसतं सिनेमा टॅक्स फ्री करून त्यांच्या वेदना कळत नाहीत”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान संजय राऊत यांच्या निवासस्थानी आज (१६ मार्च) शिवसेना खासदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. आज दुपारी एक वाजता सर्व शिवसेना खासदार एकत्रित बैठक करणार आहेत. खासदारांना विभाग निहाय राज्यातल्या जबाबदाऱ्या देण्यासंदर्भात हालचाली सुरु असल्याचे म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- शरद पवार आणि संजय राऊतांची बंद दाराआड २० मिनिटे चर्चा!
- Women’s WC 2022: भारतीय संघाने गमावला वर्ल्डकपमध्ये दुसरा सामना; केवळ १३४ धावांवर परास्त
- “सगळ्यांचं पीठ होणार हे नक्की”- चंद्रकांत पाटील
- “काश्मीरची खरी फाईल बाळासाहेब ठाकरेंना माहिती, नुसतं टॅक्स-फ्री…”, संजय राऊतांची टीका
- वीज जोडणीची अंमलबजावणी सुरु; महावितरणच्या कंपन्यांना ‘स्टॉप’ चा आदेश जारी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
