🕒 1 min read
परभणी : खासगी वैद्यकीय महाविद्यालयाऐवजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या मागणीसाठी पाथरी शहरात सर्वपक्षीय स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली. परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, ही आपल्या जिल्ह्यातील परभणीकरांची जिव्हाळ्याची मागणी असल्याचे या वेळी शिवसेना नेत्यांनी स्पष्ट केले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री आहेत. तरी देखील शिवसेनेच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आल्याने त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी आजपर्यंत अनेक उपोषणे, मोर्चे आयोजित करण्यात आले होते. मात्र शासनाने अजूनही ही मागणी पूर्ण केलेली नाही. परभणी शहर महापालिका झाल्यानंतरही कित्येक वर्षांपासून ही मागणी पूर्ण होत नाही. या विषयावर जिल्ह्यातील विद्यार्थी, नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याच अनुषंगाने शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून पाथरी येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. संत साईबाबा जन्मभूमी ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीस मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला. वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीसाठी एकदिलाने प्रयत्न करून परभणीकरांची एकजूट दाखवून देण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- आतापर्यंत झालेल्या भाववाढीसाठी देखील भाजपने ‘आर्शिवाद’ मागायला हवा- अंबादास दानवे
- ‘गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा’ ; खासदार संभाजीराजे आक्रमक
- खासदार नवनीत राणांवर मानहानीचा दावा ठोकणार, यशोमती ठाकूर यांचा इशारा
- राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप; खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या..
- पोलिसांना दिलेले चॅलेंज अंगलट! बैलगाडी शर्यत प्रकरणी पडळकरांसह ४१ कार्यकर्त्यांवर गुन्हा


