औरंगाबाद : केंद्रीय मंत्रीमंडळात नव्याने समावेश झालेल्या मंत्र्यांची ‘जनआर्शिवाद’ यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेत जनतेचा ‘आर्शिवाद’ मागत असल्याचा दावा भाजपचे नेते करत आहेत. यावर शिवसेना प्रवक्ते आमदार अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून आतापर्यंत मोठ्याप्रमाणात महागाई वाढली आहे. या संदर्भात देखील भाजपच्या नेत्यांनी लोकांच्या प्रतिक्रिया मागवाव्यात असा टोला त्यांनी लगावला आहे.
या संदर्भात आमदार दानवे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनआर्शिवाद यात्रेसाठी निघालेल्या भाजप नेत्यांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘२०१४ पासून आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मोदी सरकारच्या काळात महागाई वाढली आहे. भाजप नेत्यांनी जनआर्शिवाद यात्रेदरम्यान या महागाई संदर्भात देखील जनतेकडून प्रतिक्रिया मागवायला हव्यात.’
भाजपच्या जनआर्शिवाद यात्रेवर महाविकास आघाडीचे नेते टीका करत आहेत. इतकच नाही तर अनेक ठिकाणी या यात्रेत होणाऱ्या गर्दीमुळे गुन्हेही दाखल होत आहेत. यावरुन सध्या भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना बघायला मिळतोय. त्यात आता वाढत्या महागाईवरुन शिवसेनेचे नेते भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ज्यांचा मदिरालयावर विश्वास, त्यांचे मंदिरांशी काय देणेघेणे’; मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला टोला
- ‘गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा’ ; खासदार संभाजीराजे आक्रमक
- खासदार नवनीत राणांवर मानहानीचा दावा ठोकणार, यशोमती ठाकूर यांचा इशारा
- राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप; खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या..
- पोलिसांना दिलेले चॅलेंज अंगलट! बैलगाडी शर्यत प्रकरणी पडळकरांसह ४१ कार्यकर्त्यांवर गुन्हा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

