नाशिक : दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काल ठाणे महापालिकेतील ६७ पैकी ६६ शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे ठाणे महापालिकेवरील नियंत्रण पूर्णपणे संपले. ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईतील तब्बल ३० शिवसेना नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून हे ३० नगरसेवक शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत बोलताना म्हणाले कि, महापालिकांवर आता प्रशासकाची नेमणूक झाली आहे. त्यामुळे जे गेले ते नगरसेवक नव्हते. शिवाय अशा अफवा पसरु नका असा सल्ला देऊन आता सर्व राज्य आपल्यासाठी रिकामे आहे. त्यामुळे वाघ आता गरुड झेप घेणार आणि महाराष्ट्र शिवसेनेच्या कवेत येणार, असे म्हणत शिवसेना ही पक्ष संघटनेवरच भर देणार असल्याचे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत.
दरम्यान, नवी मुंबईतील नगरसेवकांमध्ये ऐरोली विधानसभेतील २० आणि बेलापूर विधानसभेतील १० असे एकूण 30 नगरसेवक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते. तसेच १८ पैकी जवळपास १२ खासदार संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. एकीकडे शिवसेनेत पडलेली मोठी फूट आणि भाजपने शिंदे यांना दिलेलं मुख्यमंत्रीपदामुळे शिंदे गटाची ताकद वाढली आहे. त्यामुळेच अनेक नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

