Share

“राकेश टिकैतांसोबत राजकीय भेट नाही तर गळ्यात भगवं वस्त्र का?”; संजय राऊत म्हणाले…

Published On: 

मुजफ्फरपूर : उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुजफ्फरपुरमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार राकेश टिकैत यांची भेट घेतल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी ही राजकीय भेट नसल्याचे सांगितले. “राकेश टिकैत यांची लढाई शेतकऱ्यांसोबत आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. दिल्लीच्या सिमेवर आंदोलन सुरु असतांना मी गेलो होतो. संसदेत देखील आम्ही लढाई लढली आहे. हे सर्वांना माहित आहे. राकेश टिकैत यांची लढाई ही कोणत्या पक्षाची नाही तर सर्वांची लढाई आहे”, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

यावेळी जर ही राजकीय भेट नाही तर दोघांच्या गळ्यात (संजय राऊत, राकेश टिकैत) भगव्या रंगाचा वस्त्र (दुपट्टा) आहे. याचा अर्थ काय, असा प्रश्न संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावर संजय राऊत म्हणाले, “तर काय झाले?, हा समाजाचा रंग आहे, देशाचा रंग आहे. तुम्हाला या रंगाशी अडचण आहे का?. तसेच मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवरून आलो आहे. तसेच राकेश टिकैत यांच्या कुटुंबाचे शिवाजी महाराजांच्या कुटुंबाशी एक नाते आहे. सदाशिव राव भाऊ यांचे पत्र टिकैत कुटुंबाला त्यावेळी आले होते.”

यावेळी शिवसेना उत्तर प्रदेशात लढणार का?, यावर संजय राऊत म्हणाले, “५० ते १०० जागा आम्ही पुर्ण उत्तर प्रदेशात लढणार आहोत. तसेच पुर्ण प्रयत्न असतील की उत्तर प्रदेशच्या विधानसभेत शिवसेनेचे आमदार राहतील. तसेच महाराष्ट्रत युतीचे सरकार आहे. जर उत्तर प्रदेशात काँग्रेसची इच्छा असेल तर आम्ही चर्चा करु.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!