Share

“शरद पवारांच्या अडमुठ्या धोरणामुळे ६७ एसटी कर्मचाऱ्यांचा जीव गेला”, सदावर्तेंचा गंभीर आरोप

Published On: 

मुंबई : १० जानेवारी रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी सह्याद्री अतिथी गृहावर एसटी संपबाबत महत्वाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब(Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यानंतर या बैठकीसंदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू व्हा, संप मागे घ्या, मागण्या मान्य होतील, असे आश्वासन शरद पवार यांनी केले. दरम्यान, सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत अजून किती कर्मचाऱ्यांचा जीव घेणार?, असा संतप्त सवाल करत पवारांच्या अडमुठ्या धोरणामुळे ६७ कष्टकरी एसटी कर्मचाऱ्यांचा जीव गेला, असा गंभीर आरोप वकील गुणरत्न सदावर्ते(Gunratn Sadavarte) यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना सदावर्ते म्हणाले की,’शरद पवारांच्या अडमुठ्या धोरणामुळे तसेच राज्य शासनाच्या नैराश्यामुळे ६७ कष्टकरी एसटी कर्मचाऱ्यांचा जीव गेला आहे.सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत अजून किती कर्मचाऱ्यांचा जीव घेणार?’, असा सवाल त्यांनी केला. तसेच पवारांनी कृती समितीसोबत बैठकीनंतर असे दाखवले की, त्यांनी मास्टरस्ट्रोक खेळला आहे. परंतु एसटी कर्मचाऱ्यांसमोर ते क्लीनबोल्ड झाले. ते क्लीनबोल्ड झाल्यामुळेच गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिसी ताकदीचा गैरवापर केला. कष्टकऱ्यांसमोर येऊन तोंड दाखवण्यासाठी पवारांना जागा राहिलेली नाही, असं मी ठणकावून सांगत आहे, असे सदावर्ते यावेळी म्हणाले आहे.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’जर एसटी कर्मचाऱ्यांचे मृत्यू थांबवायचे असतील तर तुम्ही आज अहवाल घेऊन या, उद्याच यावर हायकोर्टात सुनावणी होईल आणि एसटीच्या विलिनिकरणाचा निर्णय कष्टकरी कर्मचाऱ्यांच्या बाजूने येईल.’

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!