मुंबई: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या (Corona) रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा फैलाव आणखी होऊ नये यासाठी राज्यसरकारने निर्बंध लागू केले आहेत. तसेच शाळा देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर आज आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत राज्यातील निर्बंध उठण्याची शक्यता नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील शाळा बंद (School Closed) करण्याच्या निर्णयाला अनेकांनी विरोध दर्शवला आहे. या बाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले, राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शाळा चालू करण्यावर निर्णय घेतला जाईल. त्यामुळे राज्यातील शाळा आणखी १५ ते २० दिवस बंद राहणार आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील लसीकरण (Vaccination) विषयी बोलताना राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्यात लसीकरणाचं प्रमाण घटत आहे ही चिंताजनक बाब आहे. सध्या राज्यात रोज साडेसहा लाख लोकांचे लसीकरण होत आहे. आधी हे प्रमाण ९ ते १० लाख होते. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे, असं टोपे म्हणाले आहेत. तसेच कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली तरी भीती बाळगण्याचं कारण नाही. परंतु, काळजी घेण्याची गरज असल्याचे मत राजेश टोपे यांनी यावेळी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या:
- अनिल देशमुखांच्या शंभर कोटी बाबत पोलिस उपायुक्तांनीच दिले उत्तर, म्हणाले…
- कोरोनामुक्त होताच रोहित पवार मैदानात; साधला भाजपवर निशाणा
- ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’चे सुनिल मेहता यांचे निधन
- “आपल्याला कोरोना झाला नाही कारण…”; इंदुरीकर महाराजांचे अजब विधान
- अजय देवगणने स्वतःला लिहिलं पत्र ; म्हणाला, “अभिनेता म्हणून अपयशी..”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

