Share

कोरोनाचा हाहाकार; केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच ७१८ कर्मचारी पॉझिटिव्ह

Published On: 

🕒 1 min read

नवी-दिल्ली : मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे राज्यात २४ डिसेंबरला रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु त्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील सातत्याने वाढ होत आहे. असे असतांनाच आता केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच ७१८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे.

एका महिन्यात तब्बल ७१८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून अर्थसंकल्पीय अधिवेशन वेळेत पूर्ण करणे हे मोठे आव्हान ठरू शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ९ जानेवारीपर्यंत ४०० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती, तद्पश्चात बुधवारी(१२ जाने.) तब्बल ७१८ कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले.

दरम्यान, एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार या सर्व बाधित रुग्णांपैकी २०० कर्मचारी राज्यसभेतील असून इतर अन्य विभागांशी संबंधित आहेत. तसेच वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या परिपत्रकात म्हंटले आहे की,’ऑफिसमध्ये हजेरी लावणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे कामाचे तास सकाळी १० ते १०.३० च्या आसपास कार्यालयातून बाहेर पडण्याच्या वेळेत अडवले जाऊ शकते जेणेकरून प्रवासात तसेच लिफ्ट आणि कॉरिडॉरमध्ये गर्दी होऊ नये.’ तसेच ५० टक्के अधिकाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!