🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंड करत राज्यात भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेनेला मोठा झटका बसला. शिवसेनेत आता १५ आमदार उरले आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार देखील बंडाच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक घेतली. या बैठकीला तब्बल ७ खासदार गैरहजर होते. मात्र या बैठकीदरम्यान संजय राऊत आणि पक्षातील इतर खासदारांमध्ये राडा झाल्याचे समोर आला आहे. सर्व खासदारांनी राऊत यांच्याविरुद्ध भूमिका घेतली. त्यामुळे बैठकीनंतर राऊत कोणाशीही न बोलता बाहेर पडले.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये इतर सर्व खासदारांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. तसेच पक्षातील खासदारांनी शिवसेनेने एनडीएच्या राष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवार द्रोपदी मूर्मु यांना पाठिंबा द्यावा अशी भूमिका घेतली. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी यूपीएचे राष्ट्रपती पदासाठीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा द्यावा अशी भूमिका घेतली. त्यामुळे संजय राऊत व खासदारांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबतचा निर्णय दोन दिवसांत घेतला जाईल असे सांगितले आहे. दरम्यान बैठकीत झालेल्या विरोधामुळे संजय राऊत बैठकीनंतर कोणालाही न बोलता बाहेर पडले, अशी माहिती समोर आली आहे.
शिवसेनेच्या मातोश्री वरील बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये भावना गवळी – यवतमाळ वाशिम, हेमंत जाधव – परभणी, संजय महाडिक – कोल्हापूर, हेमंत पाटील – हिंगोली, श्रीकांत शिंदे – कल्याण-डोंबिवली, कृपाल तुमाने – रामटेक, कलाबेन डेलकर – दादरा-नगर-हवेली अशी नावे समोर आली आहेत. त्यामुळे हा आता शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख व प्रमुख नेते पक्ष बांधणीची कामे करत आहेत. तर दुसरीकडे पक्षातील कार्यकर्ते, नेते व पदाधिकारी शिंदे गटात सामील होण्याच्या मार्गावर आहेत.
उपस्थित खासदार
१.गजानन कीर्तिकर
२.अरविंद सावंत
३.विनायक राऊत
४.हेमंत गोडसे
५.धैर्यशील माने
६. प्रताप जाधव
७. सदाशिव लोखंडे
८. राहुल शेवाळे
९. श्रीरंग बारणे
१०. राजन विचारे
११) ओमराजे निंबाळकर
१२) राजेंद्र गावीत
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
