🕒 1 min read
औरंगाबाद : शिवसेनेतील नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. मात्र माजी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणे अगोदर शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद सह उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा निर्णय जाहीर केला. अनेक जणांनी या निर्णयाचे स्वागतही केले. तसेच या औरंगाबादच्या नामांतराला विरोधी झालेला पाहायला मिळाला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले होते की, औरंगाबाद नामांतराचा विषय हा मंत्रिमंडळ बैठकीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता, याबाबत आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती. आता यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेच्या नेत्यांकडून मंत्रिमंडळ बैठकीच्या अगोदरच सांगण्यात आले होते की औरंगाबादच्या नामांतराविषयी निर्णय घेतला जाईल. मग अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कसे काय या निर्णयाबद्दल काहीच माहिती नव्हते. हे मात्र हास्यास्पद आहे, अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
शिवसेनेतील आमदारांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याचे संकेत दिसू लागतात मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठक बोलावली होती. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे करण्याचा निर्णय घेतला होता. मागील सरकारच्या या निर्णयाबाबत सपाचे आमदार अबू आझमी यांनीही विधानसभेत याबाबत मुद्दा उचलला होता. विधानसभेत बोलताना ते म्हणाले होते की शिवसेनेने बाळासाहेबांच्या नावाने एखाद्या नवीन शहर उभारावे आणि त्याचा विकास करावा. आम्ही ते आनंदाने आणि खुशीने स्वीकारू, असा टोला यावेळी अबू आझमी यांनी शिवसेनेला लगावला होता.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
