मुंबई : राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आलं आहे. तसेच नवनिर्वाचत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मात्र गेल्या आठवड्यात विधानसभेच्या विशेष अधिवेशनात एकनाथ शिंदे यांनी बोलताना तुफान फटकेबाजी केली. यावेळी ते म्हणाले होते कि, येणाऱ्या काळात आम्ही १०० आमदार निवडून आणू. यानंतर आता शिंदेंच्या या वक्तव्याची पुनरावृत्ती शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी केली आहे
अब्दुल सत्तार म्हणाले कि, एकनाथ शिंदे हा माणसं जोडणारा नेता आहे. सध्या शिंदेंच्या गटात 50 आमदार असले तरी त्याचे 100 आमदार कधी होतील आणि म्हणू नये पण फडणवीसांचीही अडचण होऊ शकते, असा दावा त्यांनी केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे संबंध कसे ताणले गेले इथपासून शिंदेंचं संख्याबळ कसं वाढत गेलं, या सर्व बाबींवर प्रकाश टाकला.
यानंतर पुढे बोलताना एकनाथ शिंदेंसारखा नेता आणि मुख्यमंत्री आतापर्यंत पाहिला नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. राजकारणात कोण तरी नेता लागतो. म्हणून अशोक चव्हाण हे माझे नेते होते. त्यांची जन्मभूमी औरंगाबाद आहे. कर्मभूमी नांदेड आहे. आता एकनाथ शिंदे माझे गॉड फादर आहे. त्यांच्या रिक्षात आम्ही बसलो असून ते जिथे नेतील तिथे जाणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

