🕒 1 min read
मुंबई : देशात सध्या ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणालाच परवानगी देण्यात आलेली आहे. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर फोटो पोस्ट केला होता. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून आपण दुसरा डोस घेतल्याचं त्याने म्हटलं होतं. यावरून भाजपवर टीका होत आहे. या मुद्द्यावरून झालेल्या टीकेला भाजपानेही प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजप नेते यांनी शिवसेनेवर निशाना साधला आहे. “देवेंद्र फडणवीस यांना स्वतःचा प्रभाव वापरायचा असता, तर त्यांनी आपल्या पत्नी व मुलीला करोनाची लस दिली असती. अजूनही त्यांनी तसं केलेलं नाही. का उगाच कोण्या लांबच्या नातेवाईकाचे लसीकरण त्यांना चिटकवायचा प्रयत्न करताय? शिवसेनेच्या आमदार, महापौरांनी पात्र नसताना लस घेतली होती, त्याचं आधी बोला,” असा सवाल केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे
@Dev_Fadnavis यांना स्वतःचा प्रभाव वापरायचा असता तर त्यांनीआपल्या पत्नी व मुलीला कोरोनाची लस दिली असती.अजूनही त्यांनी तसे केलेले नाही.का उगाच कोण्या लांबच्या नातेवाईकाचे लसीकरण त्यांना चिटकवायचा प्रयत्न करताय? शिवसेनेच्या आमदार,महापौरांनी पात्र नसताना लस घेतलीहोती, त्याचेआधी बोला
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 20, 2021
तर दुसरीकडे ‘तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर हे अगदी अयोग्य आहे. पात्र नसल्याने मी माझ्या पत्नीला व मुलीलाही लस दिलेली नाही. प्रत्येकाने नियमांचं पालन केलच पाहिजे असं माझं ठाम मत आहे,’असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जवळचा की दूरचा? ‘तन्मय’ प्रकरणी राष्ट्रवादीने काढली देवेंद्र फडणवीसांची वंशवेल
- योगी सरकारला ‘सर्वोच्च’ दिलासा, हायकोर्टाच्या ‘त्या’ आदेशाला स्थगिती
- नागपूरसाठी १० हजार रेमडेसिवीर पाठवा, हायकोर्टाचे ठाकरे सरकारला आदेश
- कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांना क्वॉरन्टाइन करा, एमआयएमची मागणी
- ‘महाविकास आघाडी नव्हे, हे तर महाकन्फ्यूज सरकार’, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

