मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या २३ वर्षीय पुतण्यानं लस घेतल्यानं आता चांगलंच राजकारण तापलं आहे. येत्या १ मे रोजीपासून केंद्र सरकारनं देशातील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस घेण्याची मुभा दिली आहे. पण फडणवीस यांचा पुतणा तन्मय याने आधीच लस घेतल्यानं फडणवीस यांच्यावर टीका होत आहे.
यावर ‘तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर हे अगदी अयोग्य आहे. पात्र नसल्याने मी माझ्या पत्नीला व मुलीलाही लस दिलेली नाही. प्रत्येकाने नियमांचं पालन केलच पाहिजे असं माझं ठाम मत आहे,’ असे स्पष्टीकरण दिले आहे.
तन्मय माझा दूरचा नातेवाईक असे सांगून प्रकरणापासून दूर राहण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसने तन्मय हा त्यांचा जवळचा की दूरचा नातेवाईक याचा खुलासा करणारे एक वंशवेल प्रसिद्ध केली आहे.
ही वंशवेल पाहिल्यावर सख्ख्या काकांचा नातू हा जवळचा की दूरचा नातेवाईक, हे महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनी ठरवावं.@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra #DevendraFadanvis #tanmayfadnavis #खोटं_बोल_पण_रेटून_बोल pic.twitter.com/mUHvTNIBhx
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 20, 2021
ही वंशवेल पाहिल्यावर सख्ख्या काकांचा नातू हा जवळचा की दूरचा नातेवाईक, हे महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनी ठरवावं. असे या राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विटद्वारे म्हटले आहे. दरम्यान, यामुळे पुन्हा एकदा विरोधकांना फडणवीस यांच्यावर टीका करण्याची आयती संधी चालून आली आहे. यावर फडणवीस काय उत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- योगी सरकारला ‘सर्वोच्च’ दिलासा, हायकोर्टाच्या ‘त्या’ आदेशाला स्थगिती
- नागपूरसाठी १० हजार रेमडेसिवीर पाठवा, हायकोर्टाचे ठाकरे सरकारला आदेश
- कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांना क्वॉरन्टाइन करा, एमआयएमची मागणी
- ‘महाविकास आघाडी नव्हे, हे तर महाकन्फ्यूज सरकार’, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
- ‘लस घेतलेल्या वारकऱ्यांना चैत्री वारीसाठी परवानगी द्या’, कीर्तनकार महासंघाची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

