औरंगाबाद : गावगाड्याचा कारभारी ठरवण्यासाठी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी व भारतीय जनता पक्षामध्ये कोण सरस ठरणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे
राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 11 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अंशत: बिनविरोध झाल्या आहेत.
दरम्यान,कन्नडमध्ये शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला आहे. भाजपच्या नितीन पाटील यांच्या पॅनलचा 15 पैकी 8 जागांवर विजय झाला आहे तर शिवसेनेला केवळ 4 जागा जिंकण्यात यश मिळवलं आहे.
दरम्यान, हिवरेबाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवार यांची एकहाती सत्ता आली आहे. पोपटराव पवार यांच्या पॅनलने सातही जागांवर विजय मिळवलेला आहे.
महत्वाच्या बातम्या
- स्मिथच्या कृत्यानंतर आता रोहितचे कृत्य आले चर्चत
- धनंजय मुंडे व्हिडिओ कॉलवरही शरीर संबंधाची मागणी करायचे; ‘त्या’ महिलेचा गंभीर आरोप
- उस्मानाबादच्या १६८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला लवकरच मंजुरी
- आंदोलनाची पुढील रणनीतीसाठी ‘संयुक्त किसान मोर्चा’ची तातडीची बैठक
- कृषी कायद्यांविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
