Share

स्मिथच्या कृत्यानंतर आता रोहितचे कृत्य आले चर्चत

Published On: 

🕒 1 min read

ब्रिस्बेन : ब्रिस्बेन येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात हिटमॅन रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियाच्या स्मिथची नकल केली. पहिल्या सत्रादरम्यान घेण्यात आलेल्या ब्रेकदरम्यान रोहित शर्मा स्टंपपुढे गेला अन् शॅडो फलंदाजी केली. रोहित शर्माला सान्यादरम्यान शॅडो फलंदाजी करताना पाहून स्मिथ आणि चाहतेही चकीत झाले.

हिटमॅन रोहित शर्मा स्टिव्ह स्मिथचा मजाक उडवण्यासाठी असं करत असल्याचेही काही चाहत्यांना वाटलं. तर सामन्यादरम्यान समालोचन करणाऱ्या संजय मांजरेकर यांनी असं कृत्य करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. रोहित शर्माच्या या कृत्यानंतर सोशल मीडियावर स्मिथ आणि रोहित यांची चर्चा सुरु आहे. नेटकरी आपापली मतं व्यक्त करत आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान पंत फलंदाजी करताना स्मिथनं केलेल्या कृत्याची परतफेड असल्याचं काही चाहत्यांनी म्हटलं आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यान चर्चेत राहणाऱ्या अनेक घटना घडल्या. त्यातीलच एक म्हणजे या सामन्याच्या शेवटच्या दिवशी स्टीव्ह स्मिथचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात अनेकांनी केलेल्या दाव्यानुसार तो भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा बॅटींग मार्क हटवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत होता.

चौथ्या कसोटीतील पहिल्या सत्रात घेतलेल्या एका ब्रेकदरम्यान रोहित शर्मा शॅडो प्रॅक्टिस करताना दिसला. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. रोहित शर्मा शॅडो प्रॅक्टिस करत असताना स्मिथची अवाक होत त्याच्याकडे पाहात होता. रोहितच्या या कृत्यानं चाहत्यांना सिडनी कसोटीतील स्मिथच्या त्या कृत्याची आठवण करुण दिली. या व्हिडिओ वरून सोशल मीडियावर बरीच चालू आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!