मुंबई : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावलं असून पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना २९ डिसेंबरला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असल्याचं वृत्त माध्यमांनी दिले आहे.
एका बाजूला भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना एका भूखंड खरेदी प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठविल्याच्या बातम्यांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपसह ईडीवर आगपाखड केली आहे. ‘बायकांच्या पदराआड लपून खेळी करणं भाजपाने थांबवावं. भाजपला वैफल्य आणि हतबलता आल्यामुळे हे सर्व केले जात आहे. मात्र, घरातील महिलांवर आणि मुलांवर हल्ले करणे म्हणजे नामर्दानगी आहे. हे सर्व असेच सुरु राहिले तर शिवसेनेकडूनही त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जाईल.’ अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.
संजय राऊत यांची ही टीका भाजपच्या जिव्हारी लागली असून भाजपचे आमदार ऍड. आशिष शेलार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ‘अभिनेत्री कंगना रानौतवर कारवाई करताना काय मर्दानगी होती का? तिचं घर तोडताना मर्दानगी होती का? कंगना रानौतला मुंबईत प्रवेश करू देणार नाही, तोंड फोडू हे सांगताना मर्दानगी आठवली नव्हती का? त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी अगोदर स्वतःच्या पायाखालची सरकलेली जमीन बघावं’ असा टोला शेलारांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या, उगाच कांगावा कशाला करताय?’
- भेटवस्तू द्यायला आलेला सांताक्लॉज निघाला कोरोनाबाधित
- ‘लालपरी’सह एसटीचा प्रवास होणार अधिक वेगवान!
- ग्रामपंचायत निवडणूक: राम शिंदेच्या चाैंडी गावात पुतण्यानेच थोपटले काकांच्या विरोधात दंड
- ‘राऊत फक्त बडबड करतात, तर ईडी पुरावे असल्याशिवाय चौकशी करत नाही’


