Share

‘माझ्या पत्नीच्या संदर्भात शिवसेनेचे नेते बोलतात, पण मी सयंम बाळगतो’

Published On: 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ती झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने आज पत्रकार परिषदांचा धडाका लावत सरकारच्या वर्षपूर्तीच्या कारभाराला लक्ष्य केलं आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन महाविकस आघाडी सरकारच्या कामगिरीचं काळ पुस्तक प्रकाशित केलं आहे.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेना व महाविकास आघाडीतील नेत्यांना लक्ष्य केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबावर होणाऱ्या टिकेवरून भाजपला टोकाचा इशारा दिला होता. यावर फडणवीसांनी, ‘आम्ही कधीही कोणाच्या घरच्यांवर टीका करत नाही; आम्ही सयंम बाळगतो. यासंदर्भात सर्वात मोठा बळी मी आहे. माझ्या पत्नी बद्दल अधिकृत शिवसेनेचे नेते काय बोलतात, काय लिहितात, ट्विटरवर काय टाकतात हे आपण सर्वानी बघितलंय. पण त्याचा मी कांगावा करत नाही. मी राजकारणात आहे, उत्तराला उत्तरच देईन.’ असं वक्तव्य करत सल व्यक्त केली आहे.

‘उद्धव ठाकरे टिपण्णी करण्याच्या लायकीचे नाहीत’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामानाला दिलेल्या मुलाखतीवरून फडणवीसांनी घणाघात केला आहे. त्यांनी केलेली विधानं, दावे, टीका यासंबंधी देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे. ‘त्यांच्यावर टिपण्णी करण्याइतपत लायकीचे नाहीत’ अशी बोचरी टीका करतानाच त्यांनी, ‘या सरकारने फक्त स्थगितीच काम केल्याचा ‘ देखील आरोप केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!