Share

‘माझ्यावर विष प्रयोग करणाऱ्या व्यक्ती बद्दल मला माहित होते’, लता दीदींचा धक्कादायक खुलासा 

Published On: 

मुंबई : गानसम्राग्ज्ञी लता मंगेशकर यांनी नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. लता मंगेशकर यांना फार पूर्वी विषबाधा झाली होती. दरम्यान यावेळी विषप्रयोग कोणी केला होता त्या व्यक्तीविषयी माहित असल्याचं लता मंगेशकर यांनी सांगितलंय.

एक प्रसिद्ध मुलाखतीदरम्यान लता मंगेशकर म्हणाल्या, ‘या घटनेविषयी अनेक लोकांना आजही माहित नाही, आम्ही देखील फारसं बोलत नाही. ही घटना 1963 मध्ये घडली होती. त्यावेळी मला विषबाधा झाली होती आणि मी अनेक दिवस झोपून होते. मला खूप अशक्तपणा आला होता. हा प्रकार इतका भयंकर होता की मला उठून चालताही येत नव्हतं.’

‘माझ्यावर करण्यात आलेला विषप्रयोग नेमका कोणी केलाय ते आम्हाला कळल होतं. मात्र त्यावेळी त्या व्यक्तीविरोधात आम्ही काही अॅक्शन घेतली नाही. कारण आमच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. पण तो व्यक्ती असा वागू शकतो याचं आम्हाला नवल वाटलं होतं,’ असंही त्या म्हणाल्या.

त्यावेळी प्रकृती बिघडल्यावर उपचार केले असता लता दीदींना विषबाधा झाल्याचं समोर आलं. या उपचारांसाठी त्या तब्बल 3 महिने अंथरूणाला खिळून होत्या. पण जिद्दीच्या जोरावर त्यांनी पुनरागमन केलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!